काय मग होळी खेळण्यासाठी तयार झालात का? आता पुढचे काही दिवस बघायलाच नको.(After Holi Magical Face Pack! Don't walk around with a weird face) सगळीकडे नुसता रंगचरंग. लाल, गुलाबी, पिळा, हिरवा सगळ्याच रंगांचा मारा आता होणार. दरवर्षी होळीला तेवढीच मज्जा येते. होळी हा आनंदाचा सण आहे. रंगांचा सण आहे. (After Holi Magical Face Pack! Don't walk around with a weird face)आपल्या आयुष्यातही विविध रंग भरण्याची गरज असते. फिके आयुष्य जगण्याची गरज नाही याची आठवण होळी करून देते. मनातील पाप, मत्सर, वाईट साईट सगळंच होळीच्या पवित्र अग्निमध्ये जाळून टाकायचे. नंतर धुळवडीच्या दिवशी तसेच रंगपंचमीच्या दिवशी नवीन रंग आयुष्यामध्ये भरायचे. सण बरंच काही शिकवून जातात.
या होळीचे रंग होळी गेल्यावर तसेच राहतात. मनावर राहतात ते चांगलेच आहे. (After Holi Magical Face Pack! Don't walk around with a weird face)मात्र चेहर्यावरही तसेच राहतात. कान पिवळे, हात लाल, नाक गुलाबी, गाल हिरवे असा सगळा अवतार दिसत असतो. मग ऑफिसाला जाताना किंवा कुठेही जाताना तसेच रंगीबेरंगी चेहर्याने जावे लागते. कितीही ठरवलं की नैसर्गिक रंगच वापरायचे. लगेच जाणारेच रंग वापरायचे तरी कोण तरी इसम असतोच, जो न जाणारे रंग चेहर्यावर थापून जातो. (After Holi Magical Face Pack! Don't walk around with a weird face)तुमच्या मित्रपरिवारातही असे नमुने आहेत का?
मग काळजी नका करू. चेहर्याचा रंग जात नसेल तर हा सोपा उपाय करून बघा. रंग नक्कीच निघून जाईल.
१. ज्या ज्या ठिकाणी पक्का रंग लागला आहे, त्या सर्व ठिकाणी तेलाने मालीश करायचे. हातावर खोबरेल तेल घ्या ते चोळून चोळून रंगलेल्या अवयवांवर लावा. १५ ते २० मिनिटे तेल तसेच राहू द्या.
२. थोड्या वेळानंतर ते स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. रंगाचा थोडा थर त्या फडक्याने साफ होईल.
३. आता एका वाटीमध्ये थोडी मुलतानी माती घ्या. चार चमचे मुलतानी माती घेतलीत तर त्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ घाला. त्यामध्ये दोन चमचे हळद घाला. मिश्रणाची पेस्ट होईल एवढंच दूध त्यामध्ये घाला. आता तयार पॅक रंगलेल्या अवयवांना लावा. लिंबाची फोड घ्या आणि पॅकवर तो स्क्रब करा.
४. पाच मिनिटांमध्ये रंग सुटतो. फक्त रंगच नाही तर त्या रंगाचा येणारा विचित्र वासही निघून जातो.