बॉलिवूड अभिनत्रींचे सौंदर्य पाहून आपल्याला वाटते की इतक्या सुंदर, नितळ त्वचेसाठी आणि घनदाट केसांसाठी या नक्कीच महागड्या ट्रीटमेंट घेत असतील. मात्र आपल्याला वाचून खोटे वाटेल की इतक्या मोठ्या सेलिब्रिटी असूनही आपल्या सौंदर्यासाठी या अभिनेत्री अतिशय साधे घरगुती आणि स्वस्तातील उपाय करत असतात. हेच उपाय वापरुन तुम्हीही तुमचे सौंदर्य वाढवू शकता आणि पार्लरमध्ये जाण्याचा वेळ आणि पैसा यांची बचत करु शकता. तसेच चेहरा उजळवण्यासाठी केवळ महागड्या प्रॉडक्ट्सची आवश्यकता नसते हेही आपल्याला यातून समजू शकेल. पाहूया ऐश्वर्या राय-बच्चन पासून ते आलिया, मलायका, दिपिकाापर्यंतच्या अभिनेत्री कोणते घरगुती उपाय करतात.
ऐश्वर्या राय हिला चेहऱ्याला घरगुती गोष्टी लावणे जास्त आवडते. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत सांगितले. ऐश्वर्याचे केस लांबसडक आणि दाट आहेत. या केसांसाठी ती केळे, दही, अॅव्होकॅडो, मध यांचा वापर करते. कधी ती दही आणि केळ्याचा मास्क केसांना लावते तर कधी अॅव्होकॅडो आणि मधाचा सास्क लावते. तिच्या घनदाट केसांमागचे खरे कारण हेच असावे असे म्हणता येईल.
आलियाची त्वचा एकदम ग्लोइंग आणि नितळ असल्याचे आपण वेगवेगळ्या फोटोंतून आपण नेहमी पाहतो. पण या नितळ त्वचेमागचे कारण आहे आइस क्यूब, पटकन फ्रेशनेस हवा असेल तर आलिया चेहऱ्याला आईस क्यूबने मसाज करते. छान नितळ त्वचा हवी असेल तर हा एकदम सोपा उपाय असल्याचे आलिया सांगते.
दिपिका पादुकोण
दिपिकाची त्वचाही अतिशय नितळ असल्याचे आपण पाहतो. त्वचा चांगली असण्यासाठी ज्याप्रमाणे बाह्य उपाय गरजेचे असतात त्याचप्रमाणे तुमचा आहार चांगला असणेही आवश्यक असते. दिपिका आपली त्वचा चांगली राहावी यासाठी आपले डाएट चांगले ठेवण्याचा प्रयत्न करते. तसेच जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थ शरीरात जातील याची ती काळजी घेते. त्वचेचा ग्लो कायम ठेवण्यासाठी ती चेहऱ्याला मसाज करणे पसंत करते. तर घनदाट केसांसाठी ती केसांना नियमित तेलाने मालिश करते.
मलायका अरोरा
मलायका अरोरा वेगवेगळ्या गोष्टींवरुन कितीही ट्रोल होत असली तरी तिच्या सौंदर्याची तुलना आपण इतर कोणाशी करु शकत नाही. ती नितळ त्वचेसाठी कॉफी स्क्रब लावणे पसंत करते. त्यासाठी ती कॉफी पावडरमध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन हे मास्क चेहऱ्याला लावते. यामुळे डेड सेल्स आणि त्वचेवरील घाण निघून जाण्यास मदत होत असल्याचे ती म्हणते. तसेच त्वचेतील आर्द्रता टिकून राहावी यासाठी मलायका चेहऱ्याला नियमितपणे अॅलोव्हेरा जेल लावते. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.
कियारा अडवाणी
कियारा अडवाणी हिच्या सौंदर्यासाठी मुलेच नाही तर मुलीही तिच्या फॅन्स आहेत. कियारा आपल्या चेहऱ्यासाठी आजीने सांगितलेले घरगुती उपाय करणे पसंत करते. यामध्ये ती साय, बेसन, हळद, दूध यांपासून तयार केलेले फेस मास्क चेहऱ्याला लावते. तर चेहऱ्याला गुलाबपाणी लावणेही तिला आवडते.