Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग? १ चमचा ओव्याचा करा सोपा उपाय - चेहऱ्यावर येईल चमक

चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग? १ चमचा ओव्याचा करा सोपा उपाय - चेहऱ्यावर येईल चमक

Ajwain for Skincare: How to Use Carom Seeds for Acne-Free Glowing Skin ओवा केवळ पदार्थाची चव, आरोग्यासाठी नाही तर, त्वचेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी ठरतो उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2023 07:30 PM2023-07-09T19:30:59+5:302023-07-09T19:31:39+5:30

Ajwain for Skincare: How to Use Carom Seeds for Acne-Free Glowing Skin ओवा केवळ पदार्थाची चव, आरोग्यासाठी नाही तर, त्वचेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी ठरतो उपयुक्त

Ajwain for Skincare: How to Use Carom Seeds for Acne-Free Glowing Skin | चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग? १ चमचा ओव्याचा करा सोपा उपाय - चेहऱ्यावर येईल चमक

चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग? १ चमचा ओव्याचा करा सोपा उपाय - चेहऱ्यावर येईल चमक

ओवा स्वयंपाकघरात वापरण्यात येणारा मसाला आहे. या मसाल्यामुळे पदार्थाची चव वाढते. विशेषतः पराठा, भाजी, भजी या पदार्थांमध्ये ओव्याचा वापर जास्त होतो. जेवणाची रंगत ओव्यामुळे वाढतेच. पण याचे आरोग्यदायी देखील फायदे आहेत.  पोटातील दुखणे ओव्यामुळे हमखास कमी होते. पण हाच ओवा आपल्या सौंदर्यातही भर घालतो.

आता तुम्ही म्हणाला हे कसं शक्य आहे? ओव्याचं आणि ब्यूटीचं कनेक्शन काय? ओव्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांवर गुणकारी ठरते. त्वचेवर नवीन चमक आणण्यासाठी आपण चमचाभर ओव्याचा वापर करू शकता, ते कसे पाहा(Ajwain for Skincare: How to Use Carom Seeds for Acne-Free Glowing Skin ).

त्वचेवर नैसर्गिक चमक येते

त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी ओव्याचा वापर केला जाऊ शकतो. ओव्यामध्ये रक्त शुद्ध करणारे घटक आढळतात. ज्यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. याच्या सेवनाने शरीर डिटॉक्स होते. शरीरातील घाण पूर्णपणे निघते. त्याचप्रमाणे त्वचेतील घाण काढून नैसर्गिक चमक आणण्याचं काम ओवा करते.

एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ओव्याचा करा असा वापर

सर्वप्रथम, ओव्याची पावडर तयार करून घ्या. त्यात दही मिसळून पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ धुवून घ्या, व ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर कोमट  पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आपण या फेसमास्कचा वापर महिन्यातून २ वेळा करू शकता.

मुरुमांचे डाग कमी करते

ओव्यामध्ये थायमॉलचे प्रमाण जास्त असते. चेहऱ्यावर ओव्याचा वापर केल्याने त्वचेच्या संबंधित जळजळ, इन्फेक्शन, मुरुमांचे डाग कमी होतात. त्यामुळे याचा वापर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो.

केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी ओव्याचा वापर

सर्वप्रथम, ओव्याची पावडर तयार करा, ही पावडर एका बाऊलमध्ये घ्या, त्यात लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा, व ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. १५ मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवा.

Web Title: Ajwain for Skincare: How to Use Carom Seeds for Acne-Free Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.