Join us  

आलिया भट आणि शाहीन भटच्या नितळ त्वचेचं सिक्रेट काय? बहिणींचा परफेक्ट ५ स्टेप ब्यूटी फॉर्म्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2023 3:37 PM

Alia Bhat Shaheen Bhat Skin Care Routine : म्हणून दोघींची त्वचा आहे इतकी सुंदर-मुलायम..

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि तिची बहिण शाहिन भट या दोघी विविध कारणांमुळे कायमच चर्चेत असतात. या दोघींची त्वचा इतकी नितळ आणि सुंदर आहे की यासाठी त्या नेमकं काय करतात असा प्रश्न अनेकींना पडतो. आपलीही त्वचा अभिनेत्रींप्रमाणेच सुंदर-मुलायम असावी असं आपल्याला कायम वाटतं. पण काही ना काही कारणाने चेहऱ्यावर फोड येणे, खड्डे पडणे, डाग पडणे अशा समस्या उद्भवतातच. मात्र नियमितपणे चांगले स्कीन केअर रुटीन फॉलो केल्यास या समस्या दूर होण्यास मदत होते. पाहूया आलिया आणि शाहीन त्यांच्या त्वचेची कशी काळजी घेतात (Alia Bhat Shaheen Bhat Skin Care Routine). 

१. क्लिंजिंग

क्लिंजिंग ही त्वचेसाठी अतिशय महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे. यासाठी आलिया सेटाफीलचे क्लिंजर वापरत असल्याचे ती सांगते. यामुळे त्वचेतून होणारी तेलाची निर्मिती कमी होण्यास मदत होते. तर शाहीनची स्कीन कोरडी असल्याने ती कोणत्याही प्रकारचे क्लिंजर न वापरता फक्त साध्या पाण्याने तोंड धुण्याला प्राधान्य देते. 

(Image : Google)

२. टोनिंग 

त्वचेतील ओलावा टिकून राहावा यासाठी आलिया बायोमा बॅलन्सिंग फेस मिस्ट हे टोनर वापरते. हे टोनर लावायला अतिशय सोपे असून ते त्वचेच्या आतपर्यंत चांगले मुरते आणि त्वचेचे पोषण होण्यास त्याची चांगली मदत होते. टोनरमधील प्रोबायोटीक्स पिंपल्स, कोरडेपणा, पुरळ दूर करण्यास मदत करतात.

३. सिरम

शाहिनची त्वचा कोरडी असल्याने ती सिरमचा आवर्जून वापर करते. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते. हायलोरोनिक सिरम हा त्यासाठी उत्तम पर्याय असून त्यामुळे त्वचेचा पोत छान दिसतो. त्यानंतर ती सेरामेडचे सिरम लावते, ज्यामुळे तिची खराब झालेली त्वचा चांगली होण्यास मदत होते. तसेच डोळ्याखाली शाहिन कॅफेन सोल्यूशन लावते. त्यामुळे डोळ्याखालचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते आणि सुरकुत्या किंवा सूज असेल तर तिही नाहीशी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. तर आलिया रोड पेप्टाइड ग्लेझिंग फ्लुइड हे सिरम वापरते. 

४. मॉईश्चरायजिंग

सिरमचा योग्य पद्धतीने फायदा होण्यासाठी त्यावर मॉईश्चरायजर लावणे गरजेचे असते. आलिया D’You य़ा ब्रँडचे मॉईश्चरायजर वापरते. यामध्ये सेरामेडचा कंटेंट जास्त असल्याने ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. तर शाहीन तिच्या त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितलेले A-Derma Epitheliate A.H. Ultra Soothing Repairing Cream वापरते. 

(Image : Google)

५. सनस्क्रीन 

संपूर्ण स्कीन केअर रुटीनमधील ही सर्वात महत्त्वाची स्टेप असून या दोन्ही बहिणी त्वचा चांगली राहण्यासाठी सनस्क्रीन वापरतात. आलिया सांगते की ती कोणताही मेकअप करण्याच्या आधी त्वचेला भरपूर सनस्क्रीन लावते. या दोघी Isdin Fotoprotector Fusion Water SPF 50 हे सनस्क्रीन लावतात, जे लावल्याने चेहरा खूप पांढराही दिसत नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआलिया भट