त्वचा मेंटेन ठेवण्यासाठी बहुतांश जणी फेशियल, क्लिनअप करतात. प्रदुषण, धूळ, ऊन या सगळ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी अधूनमधून असे सौंदर्योपचार करणं गरजेचंच असतं. काही जणी हे सगळे उपाय घरच्याघरी करतात, तर काही जणी त्यासाठी पार्लर गाठतात. अभिनेत्री आलिया भटहीत्वचेची काळजी घेण्यासाठी एक खास पद्धतीचं आणि तिच्या अतिशय आवडीचं असणारं फेशियल नेहमीच करते (Alia Bhat's favourite facial). ते फेशियल कोणतं आणि ते ती कशा पद्धतीने करते (Alia Bhat's beauty secret), याविषयीचा तिचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
आलिया भट काेणतं फेशियल करते?
आलिया भट कोणतं फेशियल नियमितपणे करते, याविषयीचा तिचा व्हिडिओ vogueindia या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आलियाने असं सांगितलं आहे की आईस फेशियल हे तिच्या अतिशय आवडीचं फेशियल असून त्वचेवरचा गुलाबी ग्लो कायम ठेवण्यासाठी ती आईस फेशियल नियमितपणे करते.
पोट साफ होत नाही, अस्वस्थ वाटतं? आहारतज्ज्ञ सांगतात, ५ कारणं आणि सोपे उपाय
आईस फेशियल केल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेखाली रक्ताभिसरण क्रिया अधिक जलद होते. त्यामुळे त्वचेवर चमक येण्यास मदत होते. आठवड्यातून एक- दोन वेळा आलिया भट करते तसं आईस फेशियल करायला हरकत नाही. बऱ्याचदा मेकअप करण्याच्या आधीही चेहऱ्याला बर्फ लावून मसाज केली जाते. मेकअपसाठी नॅचरल प्रायमर म्हणून आईस फेशियल ओळखलं जातं.
कसं करायचं आईस फेशियल?
आईस फेशियल करण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आलिया भट करतेय त्याप्रमाणे आहे. एका भांड्यात बर्फाचं थंडगार पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये तुमचा चेहरा काही सेकंदासाठी बुडवून ठेवा. जेवढे सेकंद सहजशक्य होतं, तेवढेच सेकंद चेहरा बुडवून ठेवावा. असं दोन ते तीन वेळा करावं.
लग्नसराई स्पेशल : आर्टिफिशियल पोल्की ज्वेलरी घ्या, पाहा नजर खिळवून ठेवणारे स्टायलिश- सुंदर दागिने
दुसरा प्रकार म्हणजे चेहऱ्यावर बर्फाने मसाज करणं. यासाठी बर्फाचा एक तुकडा कापडामध्ये गुंडाळून घ्या आणि तो काही सेकंदासाठी हळूवारपणे तुमच्या चेहऱ्यावर फिरवा.