आलिया भट ही सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच तिचे नैसर्गिक सौंदर्य, फिगर आणि स्वत:ला कॅरी करण्याची पद्धत यांमुळे ती कायमच चर्चेत असते. संतूर मॉम म्हणून ओळख असलेली आलिया फिटनेस, ब्यूटी आणि फॅशनबाबत कायमच जागरुक असल्याचे पाहायला मिळते. आलियाची त्वचा अतिशय नितळ आणि चमकदार असून यामागचे नेमके रहस्य काय? मेकअप न करताही तिचा चेहरा इतका छान ग्लो कसा करतो आणि मेकअप करुनही ती नॅचरल कशी दिसते असे अनेक प्रश्न तिचे फॅन असणाऱ्यांना कायमच पडतात. आलिया कुठेही बाहेर जाताना दिसली की ती इतकी सुंदर कशी दिसते आणि तिची त्वचा इतकी ग्लो कशी करते असं साहजिकच तरुणींना वाटतं. त्यामागे नेमकं काय रहस्य आहे आणि मेकअप करते म्हणजे आलिया नेमकं काय करते याबाबत तिने स्वत:च एका युट्यूब चॅनेलवर सांगितले आहे. त्या टिप्स नेमक्या काय आहेत पाहूया (Alia Bhatt 10 minuets make up routine)...
1. खूप काळ उन्हात राहून, काम करून किंवा फिरूनही तुमची त्वचा एकदम स्वच्छ, नितळ दिसावी यासाठी समर फ्रायडे स्किन टिंट, हे लावताना ती त्यात कोका प्रायमर मिक्स करते. हा प्रायमर हायलायटर, क्रीम असं सगळं एकत्र काम करत असल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास त्याची चांगली मदत होत असल्याचे ती म्हणते.
2. यानंतर ती कोसास ब्रँडचे कंसिलर लावते. तिला क्रीमी प्रकारातील कं सिलर आवडत असून डोळ्याखालचे स्पॉट किंवा आणखी काही झाकण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
3. बिम या ब्रँडचा गलोसियर लावण्याला आलिया पसंती देते. गालाच्या वर आलेल्या भागावर आणि हनुवटी, नाकाच्या मध्यभागी हे लावून ते ब्रशने ब्लेंडरने ते नीट ब्लेंड करावे.
४. यानंतर ती डोळ्यांखाली आणि आवश्यक त्या ठिकाणी अवरग्लासची पावडर ब्रशने एकसारखी लावते जेणेकरुन आधी लावलेल्या सगळ्या गोष्टी नीट सेट व्हायला मदत होते.
५. मग आपल्या आवडीच्या २ ते ३ शेड आय शॅडो पॅलेटमधून निवडून ती डोळ्यांच्या मेकअपला सुरुवात करते. पिच आणि गुलाबी हा डोळ्यांसाठी आपल्या आवडीचा रंग असल्याचे आलिया सांगते.
६. आपली मेकअप आर्टीस्ट पुनीत हिच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्याचे सांगत ती पापण्यांना शेप देते आणि गुचीचा मस्कारा लावते आणि आयब्रोजना थोडे शेप करते.
७. मग ब्रशने चेहऱ्याला सगळीकडे पावडर लावून चिक्सला हायलाईट करण्यासाठी साधासा हायलायटर लावते.
८. सगळ्यात शेवटी मॅट रंगाची स्कीन टोनला सूट करणारी अशी पिच रंगाची लिपस्टीक लावून त्यावर लिप बाम लावते. या २ गोष्टी आपण सतत चट अप करत राहतो असे ती सांगते. ही लिपस्टीक आणि लिप बाम कायम आपल्या बॅगमध्ये असते हे सांगायलाही ती विसरत नाही.