Lokmat Sakhi >Beauty > आलिया भट म्हणते, मी वापरतच नाही फाऊंडेशन कधीच! तिच्यासारख्या लूकसाठी करा ४ गोष्टी...

आलिया भट म्हणते, मी वापरतच नाही फाऊंडेशन कधीच! तिच्यासारख्या लूकसाठी करा ४ गोष्टी...

Alia Bhatt's 10-Minute No Foundation Makeup Routine : Alia Bhatt's Quick 10-Minute Makeup Routine Revealed No Foundation Super Style Tips : Alia Bhatt Shares Her 10-Minute No Foundation Make-Up Routine For Glowing Look : स्किन केअर रुटीनमध्ये फाऊंडेशन न वापरता त्याऐवजी कोणते सोपे घरगुती उपाय करायचे ते पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 17:27 IST2024-12-13T17:11:23+5:302024-12-13T17:27:01+5:30

Alia Bhatt's 10-Minute No Foundation Makeup Routine : Alia Bhatt's Quick 10-Minute Makeup Routine Revealed No Foundation Super Style Tips : Alia Bhatt Shares Her 10-Minute No Foundation Make-Up Routine For Glowing Look : स्किन केअर रुटीनमध्ये फाऊंडेशन न वापरता त्याऐवजी कोणते सोपे घरगुती उपाय करायचे ते पहा...

Alia Bhatt Shares Her 10-Minute No Foundation Make-Up Routine For Glowing Look Alia Bhatt's 10-Minute No Foundation Makeup Routine | आलिया भट म्हणते, मी वापरतच नाही फाऊंडेशन कधीच! तिच्यासारख्या लूकसाठी करा ४ गोष्टी...

आलिया भट म्हणते, मी वापरतच नाही फाऊंडेशन कधीच! तिच्यासारख्या लूकसाठी करा ४ गोष्टी...

आजकाल सेलिब्रिटी अभिनेत्रींच्या ब्यूटी टिप्स फॉलो करण्याचा एक नवा ट्रेंड आला आहे. सध्या अनेकजणी त्वचा सुंदर दिसण्यासाठी किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी (Alia Bhatt's 10-Minute No Foundation Makeup Routine) कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रींचे ब्यूटी सिक्रेट किंवा टिप्स फॉलो करतात. याचबरोबर, आजकाल नैसर्गिक आणि लाइटवेट मेकअप लुकला अधिक पसंती दिली जाते. अशातच आलिया भट (Alia Bhatt's Quick 10-Minute Makeup Routine Revealed No Foundation Super Style Tips) तिच्या नैसर्गिक आणि लाइटवेट मेकअप लुकसाठी फारच लोकप्रिय आहे. आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती फाउंडेशन वापरत नसल्याचे सांगत आहे(Alia Bhatt Shares Her 10-Minute No Foundation Make-Up Routine For Glowing Look).

मेकअप करायचा म्हटलं की आपण सर्वात आधी मेकअप करण्यासाठी छान फाऊंडेशन लावून मेकअप बेस तयार करतो. त्यानंतर त्यावर इतर क्रिम्स आणि पावडर लावतो आणि उरलेला मेकअप करतो. परंतु आलियाच्या ब्यूटी टिप्सनुसार, खरंतर फाऊंडेशन लावण्याची फारशी गरज नसते. फाऊंडेश न लावता देखील आपण तितकाच सुंदर आणि परफेक्ट मेकअप करु शकतो. आपल्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये फाऊंडेशनचा वापर न करता देखील आपली त्वचा तितकीच सुंदर आणि ग्लोइंग ठेवू शकतो. आपण आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये रोज  फाऊंडेशनचा वापर न करता त्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय देखील करु शकतो. स्किनसाठी फाऊंडेशनचा वापर करायचा नसल्यास नेमकं काय करायचं ते पाहूयात.         

हे एक खास स्किनकेअर रुटीन करा फॉलो, फाऊंडेशन वापरणे विसरुन जाल... 

स्टेप १ :- क्लिंझिंग :- जर तुमची त्वचा ड्राय असेल कच्चे दूध क्लिंझिंगसाठी वापरावे. जर तुमचा स्किन टाईप ड्राय नसेल तर आपण तांदुळाच्या पाण्याचा किंवा गुलाबपाण्याचा वापर करु शकता. तुमच्या स्किन टाइपनुसार यातील कोणताही एक पदार्थ कापसाच्या बोळ्यावर घेऊन त्वचेवर लावून त्वचेच्या छिद्रातील घाण, धूळ आणि माती पुसून स्वच्छ करुन घ्यावी. अशाप्रकारे त्वचेचे क्लिंझिंग करून घ्यावे. 

लग्न ठरलंय आणि चेहऱ्यावर चमचमता ग्लो हवाय? खा हिवाळ्यातले ५ सुपरफूड, चेहरा चमकेल सोन्यासारखा...

स्टेप २ :- टोनिंग :- त्वचेचे टोनिंग करण्यासाठी सर्वात आधी एका स्प्रे बॉटलमध्ये तांदुळाचे पाणी आणि गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन मिक्स करावे. दररोज क्लिंझिंग झाल्यावर या स्प्रे बॉटलमधील तांदुळाचे पाणी आणि गुलाबपाण्याचा स्प्रे त्वचेवर स्प्रे करून त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने टोनिंग करून घ्यावे. 

स्टेप ३ :- मॉइश्चरायझझिंग :- मॉइश्चरायझझिंग करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ टेबसलस्पून एलोवेरा जेल घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून गुलाबपाणी, बदामाचे तेल आणि १ व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल घालावी. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. रोज रात्री झोपताना हे घरगुती मॉइश्चरायझर त्वचेला लावून हलक्या हातांनी मसाज करून घ्यावा. 

बहुगुणी आवळा केसांसाठी नवसंजिवनीनी, फक्त 'या' ४ पद्धतींनी वापर करा, हेअर प्रॉब्लेम्स होतील कमी...

 स्टेप ४ :- सनस्क्रीन लावा :- चौथ्या स्टेपमध्ये आपल्या त्वचेसाठी सनस्क्रीन लावायला विसरु नका. घरातून बाहेर पडताना किंवा ऊन्हात जाताना सगळ्यात आधी त्वचेला सनस्क्रीन लावा. आपले डेली स्किन केअर रुटीन फॉलो करताना सनस्क्रीनचा वापर करायला विसरु नका.

 

अशाप्रकारे आपल्याला जर फाऊंडेशन वापरायचे नसल्यास आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी हे डेली स्किन केअर रुटीन फॉलो करु शकतो.

Web Title: Alia Bhatt Shares Her 10-Minute No Foundation Make-Up Routine For Glowing Look Alia Bhatt's 10-Minute No Foundation Makeup Routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.