अभिनेत्री अलिया भट (Alia Bhatt) सध्या तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या प्रमोशन ॲक्टीव्हिटीमध्ये कमालीची बिझी झाली आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या तरी साेशल मिडियावर या चित्रपटाचं जबरदस्त ब्रँण्डिंग करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाची चर्चा तर सर्वत्र होतच आहे, पण त्यासोबत अलिया आणि तिचा पांढऱ्या साडीतला प्रत्येक लूकही खूप गाजतो आहे...
आजकाल चित्रपटाची जी धाटणी आहे किंवा जशी कथा आहे, त्यापद्धतीचं ड्रेसिंग करून त्याचं प्रमोशन करायचं हा नवाच ट्रेण्ड पहायला मिळत आहे. म्हणूनच तर 'अतरंगी' चित्रपटासाठी सारा अली खान हिने प्रत्येक वेळी प्रमोशनसाठी लेहेंगा घातला. आता आलिया तिच्या गंगुबाई या भुमिकेशी मिळती- जुळती वेशभुषा करून चित्रपटाचं जबरदस्त प्रमोशन करत आहे. त्यामुळे सध्या अलिया पांढऱ्या, मोतिया या रंगाच्या साड्यांमध्येच जास्त दिसते आहे..
अलियाने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामला शेअर केली असून यात पुन्हा एकदा ती पांढऱ्या साडीत दिसते आहे. पांढऱ्या रंगाच्या या साडीचे काठ सोनेरी रंगाचे असून साडीवर पिवळी फुले आहेत.. अलियाने या साडीवर मोतिया रंगाचं व्ही शेप नेक असणारं ब्लाऊज घातलं आहे. अगदी हलकासा मेकअप, छोटीशी काळी टिकली आणि कानात चंदेरी रंगाचे झुमके.... असा एवढाच मेकअप अलियाने केला असला तरी ती अतिशय देखणी दिसते आहे..
photo credit- google
गंगुबाईच्या निमित्ताने अलियाकडचं पांढऱ्या साड्याचं कलेक्शन महिला वर्गाला विशेष आवडत आहे... त्यामुळेच तर तिचा प्रत्येक लूक चर्चेत आहे. आता लवकरच उन्हाळा येणार आहे. उन्हाळ्यात अशा रंगांची चलती असतेच.. त्यामुळे आलियाचं पाहून तुम्हालाही पांढऱ्या साड्यांचं कलेक्शन करावं वाटू शकतं.. अनेकदा पांढरी साडी आपल्याला शोभेल की नाही, ही शंका अनेक जणींच्या मनात येते. त्यामुळे खूप इच्छा असूनही त्या पांढऱ्या साड्या घेत नाहीत.. पण या काही साध्या- साध्या गोष्टींची काळजी घेतली तर पांढऱ्या साडीत तुम्हालाही मिळू शकतो अलियासारखा स्मार्ट, कुल आणि सुंदर लूक...
पांढरी साडी नेसताना ही काळजी घ्या...- स्वस्तात मस्त पांढरी साडी घेण्याच्या भानगडीत पडू नका. पांढरी साडी ट्रान्सपरंट असण्याची शक्यता जास्त असते.. त्यामुळे पांढरी साडी घेणार असाल तर कपड्याचा पोत सगळ्यात तपासून पहा.- पांढऱ्या साडीवर खूप जास्त मेकअप मुळीच करू नका..- मोत्याचे दागिने किंवा सिल्व्हर- ऑक्सिडाईज ज्वेलरी पांढऱ्या साडीवर अधिक खुलून दिसतात.- पांढऱ्या साडीवर ब्लाऊज शिवताना ब्लाऊजची बटणं मागच्या बाजूला असतील आणि समोरून प्रिंसेस कट असेल, असं ब्लाऊज शिवा. पांढऱ्या साड्या पारदर्शक असल्याने अशी काळजी घेणं गरजेचं आहे.- पांढऱ्या साडीसाठी तुम्ही जो पेटीकोट घेणार तो साडीच्या रंगाशी अगदीच मिळता जुळता असावा... त्यात इतर साड्यांसारखं उन्नीस- बीस अजिबात करू नका. कारण पांढरी साडीचा पारदर्शकपणा अधिक असल्याने अशी काळजी घ्यावीच लागते.