Join us

आलिया भटच्या ५ ब्यूटी टिप्स- नवरात्रात तुमच्याही चेहऱ्यावर झळकेल आलियासारखं तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2023 21:35 IST

Alia Bhatt’s skincare routine explained in 5 simple steps : नवरात्रात गरबा खेळायला जाताना मेकअपची गरज नाही इतका चेहरा दिसेल चमकदार

नऊ रंगाचा-नऊ दिवसांचा सण काही दिवसात सुरु होईल. या सणासाठी खास सर्वत्र जोरदार तयारी सुरु झाली आहे. उपवास, पूजा पाठ व्यतिरिक्त महिलावर्ग ड्रेस, मेकअप, स्किन केअरकडे अधिक लक्ष देतात. अनेक महिला नटून-थटून गरबा खेळायला जातात. आपली स्किन ग्लो व सुंदर दिसावी यासाठी अनेक महिला विविध उपाय करून पाहतात.

जर आपल्याला देखील चमकदार त्वचा हवी असेल तर, अभिनेत्री आलिया भट्टने शेअर केलेली स्किन केअर रुटीन फॉलो करून पाहा. या स्किन केअर टिप्समुळे आपली त्वचा अधिक सुंदर दिसेल, व त्यावर नैसर्गिक ग्लो येईल(Alia Bhatt’s skincare routine explained in 5 simple steps).

क्लींजिंग

आलिया सांगते, सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम त्वचा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुण्यासाठी आपण फेस वॉशचा वापर करू शकता. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर साबण वापरणे टाळा.

काखेतील काळवंडलेल्या त्वचेमुळे त्रस्त आहात? खर्च टाळा - ४ घरगुती सोपे उपाय करा, काही दिवसात दिसेल फरक

टोनिंग

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर स्किन टोन करा. टोनर पीएच पातळी संतुलित ठेवते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. जर आपली त्वचा तेलकट असेल तर, आपण रोज याचा वापर करू शकता.

सीरम

टोनरऐवजी आपण सिरमचा देखील वापर करू शकता. सीरम त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. सीरममध्ये असलेले गुणधर्म त्वचेला दुरुस्त करण्याचे काम करतात. मात्र, सीरम आपल्या स्किन टाईपनुसारच खरेदी करावा.

मॉइश्चरायझर

स्किन मुलायम हवी असेल तर, नियमित मॉइश्चरायझर लावा. जर त्वचेत ओलावा नसेल तर ती कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे त्वचेवर खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावा.

मेहेंदीत मिसळा स्वयंपाकघरातील २ गोष्टी, अकाली पांढरे झालेले केस, गळण्याची समस्या होईल गायब

सनस्क्रीन

आलिया भट्ट नेहमी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देते. सनस्क्रीन केवळ उष्णता आणि सूर्यप्रकाशासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठीच नाही तर, प्रदूषणापासून देखील सरंक्षण करते.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023ब्यूटी टिप्सआलिया भट