वातावरणातील बदलामुळे आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांवरही परिणाम दिसून येतो. कधी केस कोरडे पडतात तर कधी मोठ्या प्रमाणात गळतात. केस गळू नयेत यासाठी तुम्ही आहारात पोषक पदार्थ असावे लागतात. (Biotin Laddu Recipe For Hair Growth) हिवाळ्याच्या दिवसांत पौष्टीक लाडूंचा आहारात समावेश करून तुम्ही केस वाढवू शकता केस गळणं थांबवण्यासाठी बाजारात अनेक तेल शॅम्पू उपलब्ध आहेत. (Ladoo For Hair Growth)
या केमिकल्सयुक्त उत्पदनांचा वापर करण्यापेक्षा आहारात जर पौष्टीक लाडूंचा समावेश केला तर केसांची वाढ चांगली होईल. कंबरेचे हाडांचे त्रास दूर करण्यासाठी अळीवाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. या लाडूंचे सेवन केल्याने फक्त हाडं चांगली राहत नाही तर केसांनाही पुरेपूर पोषण मिळते. (Laddu For Hair Growth)
अळीवाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य (How to Make Alive Ladoo)
१) अळीव- अर्धी वाटी
२) नारळाचे पाणी- अर्धा किंवा एक ग्लास
३) ओल्या खोबऱ्याचा किस- ३ वाटी
४) बारीक चिरेला गूळ- ३ वाटी
५) साजूक तूप- ४ ते ५ चमचे
६) काजूचे काप- १ छोटी वाटी
७) बदामाचे काप- १ छोटी वाटी
८) वेलची पावडर- एक चमचा
९) जायफळ पूड- पाव चमचा
१०) सुंठ पावडर- अर्धा चमचा
अळीव लाडू करण्याची सोपी रेसिपी (Aliv Ladoo Making Process)
१) अळीवाचे लाडू करण्यासाठी अर्धी वाटी अळीव मंद आचेवर ७ ते ८ मिनिट भाजून एका ताटात काढून घ्या. गार झाल्यानंतर स्वच्छ धुवून पाऊण वाटी नारळाच्या पाण्यात भिजवत ठेवा.
थंडीत रोज चपातीबरोबर १ गुळाचा खडा खा, हाडं होतील बळकट-हिमोग्लोबिन भरपूर वाढेल
२) नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पाण्यात भिजवत ठेवू शकता. अळीव भिजल्यानंतर त्यात अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ आणि ओल्या नारळाचा किस घालून एकजीव करून घ्या
३) कढईत तूप घालून त्यात बदामाचे काप, काजूचे काप परतून घ्या मग त्यात अळीवाचे मिश्रण घाला. तुम्हाला तूप घालायचं नसेल ही स्टेप स्किप केली तरी चालेल.
टपरीवर मिळतो तसा परफेक्ट चहा घरीच करा; दूधात घाला 'हा' पदार्थ, गारठ्यात प्या गरमागरम चहा
४) पीठ एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात सुंठाची पावडर घाला. चमच्याच्या साहाय्याने एकजीव केल्यानंतर हाताने लाडू वळून घ्या. तयार आहेत मऊसूत अळीवाचे लाडू. हे लाडू तुम्ही १ ते २ महिने ठेवू शकता. फक्त हवाबंद डब्यात किंवा फ्रिजमध्ये ठेवा.