घाईगडबडीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे आरोग्याच्या निगडित असंख्य समस्या निर्माण होतात. ज्याची आपल्याला कल्पना देखील नसते. लठ्ठपणा, हृदयाच्या संबंधित आजार यासह हेअर प्रॉब्लेम्समुळे व्यक्ती त्रस्त होतो. सध्या कमी वयातच लोकांचे केस पांढरे व गळू लागले आहेत.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची शक्यता निर्माण होते. केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक प्रॉडक्ट्सचा वापर करतो. काही प्रॉडक्ट्स उपयुक्त ठरतात तर, काही प्रॉडक्ट्समुळे केसांची वाढ खुंटते. केसांची समस्या सोडवण्यासाठी आपण अळीवाचा आहारात समावेश करू शकता. या बियांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत करण्याची, कोंडा कमी करण्याची व केसांना पोषण देण्याची ताकद असते. अळीवाचे लाडू खाल्ल्याने केसांची री - ग्रोथ होते. व केसांच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होते(Aliv Ladoo Recipe | Perfect For Hair Fall & Growth).
केसांच्या री - ग्रोथसाठी होते मदत
केसांसाठी अळीवाचे लाडू फायदेशीर ठरते. यामध्ये कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. या बियांचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या सुटतात. यासह केस गळती देखील रोखते. त्यातील प्रथिने केस घनदाट करतात.
स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारते
अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, जे केसांचे रक्ताभिसरण वाढवण्याचे काम करतात. खरंतर लोहाच्या कमतरतेमुळे केस गळतात, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होत नाही. अशा परिस्थितीत केस विरळ दिसतात. यावर उपाय म्हणून अळीवाचे लाडू खा.
केस काळेच ठेवते
अळीवामध्ये व्हिटॅमिन ई असते, जे केसांचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई कोलेजन वाढवते, जे केस पांढरे होण्यापासून रोखते. त्यामुळे रोज एक अळीवाचे लाडू दुधासोबत खा. हे लाडू एक पेक्षा जास्त खाऊ नका. कारण अळीवाचे प्रभाव गरम असते. हे लाडू अति खाल्ल्याने शरीराला हानी पोहचू शकते.