Lokmat Sakhi >Beauty > केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

Almond Oil, Henna Treatment Mask For Long And Lustrous Hair मेहेंदी लावली की केस कोरडे होतात असा अनुभव असेल तर हे तेल फार कामाचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 03:47 PM2023-07-07T15:47:16+5:302023-07-07T15:47:55+5:30

Almond Oil, Henna Treatment Mask For Long And Lustrous Hair मेहेंदी लावली की केस कोरडे होतात असा अनुभव असेल तर हे तेल फार कामाचे.

Almond Oil, Henna Treatment Mask For Long And Lustrous Hair | केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात केसांकडे लक्ष द्यायलाच जमेल असे नाही. काही वेळेला केसांकडे दुर्लक्ष होते. ज्यामुळे केसांच्या निगडीत समस्या वाढतात. मुख्य म्हणजे केस पांढरे होतात. पांढऱ्या केसांवर उपाय म्हणून काही महिला ब्यूटी ट्रिटमेंट घेतात. तर काही घरगुती उपाय करून पाहतात. ज्यात मेहेंदीचा देखील समावेश आहे.

मेहेंदी हा एक नैसर्गिक उपाय आहे. ज्यामुळे केस काळे तर होतातच. यासह केसांच्या समस्याही सुटतात. जर केस आणखी सिल्की, शाईन व मजबूत करायचे असतील तर, त्यात बदाम तेल अॅड करा. मेहेंदीमध्ये बदाम तेल मिक्स केल्यावर केसांना कोणते फायदे होतात, हे पाहूयात(Almond Oil, Henna Treatment Mask For Long And Lustrous Hair).

या पद्धतीने मेहेंदीमध्ये मिक्स करा बदाम तेल

केसांवर मेहेंदी लावण्यासाठी प्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्या. नंतर त्यात मेहेंदी पावडर घालून मिक्स करा. आता त्यात बदामाच्या तेलाचे काही थेंब घालून मिक्स करा. त्यावर झाकण ठेऊन ३० मिनिटांसाठी बाजूला ठेवा. केस विंचरून घ्या. केसांवर हाताने मेहेंदी लावा, व एका तासानंतर केस पाण्याने धुवा. व दुसऱ्या दिवशी शाम्पूने केस धुवा.

कोंडा होईल कमी

मेहेंदीमध्ये बदाम तेल मिक्स केल्याने कोंड्यापासून सुटका मिळू शकते. स्काल्प कोरडी झाल्यामुळे कोंडा तयार होतो. हा कोरडेपणा कमी करण्यासाठी बदामाचे तेल मदत करू शकते. यासह खाज, केस गळती, केस पांढरे होणे यापासूनही सुटका मिळू शकते. मेहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळल्यास टाळूची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.

खोबरेल तेल रात्री लावा, सकाळी पहा जादू, पिवळे दात ते तुटकी नखे - समस्या गायब

स्काल्प स्वच्छ राहील

बदाम तेलात असणारे गुणधर्म स्काल्प क्लिन ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. व केसांची री- ग्रोथ होते.

केसांची वाढ होते

बदामाचे तेल हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रोटीन आणि अमिनो ॲसिडने युक्त आहे. मेहेंदीमध्ये बदाम तेल मिक्स करून लावल्यास, स्काल्पवर कोंडा जमा होत नाही. ज्यामुळे केसांची वाढ होते. व केसांना नवीन मजबुती मिळते.

केस गळून विरळ झाले? रामदेव बाबा सांगतात 1 सोपा उपाय, केस होतील लांब घनदाट

केस निरोगी राहतील

बदाम तेल मेहेंदीमध्ये मिसळून लावल्यास केस निरोगी होतात. मेहेंदीमध्ये बदाम तेल मिसळल्यास मेहेंदीचे पोषण दुप्पट होते. बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन अ, ब आणि ई चे गुणधर्म, टाळूतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे केस निरोगी होतात. यासह केस सिल्की - शाईन करतात.

Web Title: Almond Oil, Henna Treatment Mask For Long And Lustrous Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.