Join us  

घरीच करता येईल २ बदामांचं काजळ, डोळे दिसतील पाणीदार-सुंदर- केमिकलचाही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 2:30 PM

Almond Oil Kajal For Dark Smoky Eyes : बदामाचे काजळ एकदा लावून तर पाहा, लोकं म्हणतील ' तेरे मस्त मस्त दो नैन '

आपण पाहिलं असेल, आपली आई-आजी नेहमी घरात तयार केलेले काजळ वापरत असत. पण आत्ताची पिढी महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. लिपस्टिक, आयलायनर, कन्सिलर, फाउंडेशन यासह टोकदार डोळ्यांसाठी काजळचा (Kajal) वापर करतात. बाजारात काजळ ५०० रुपये पर्यंतच्या रेंजमध्ये आरामात मिळतात. पण काही काजळांमध्ये केमिकल रसायनांचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता जास्त असते.

डोळ्यांना इजा होऊ नये, शिवाय डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी आपण बदामाचा वापर करून काजळ तयार करू शकता. बदाम फक्त स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नसून, डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते. बदामाच्या तेलातील व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या नाजुक त्वचेचं पोषण करते. ज्यामुळे काळी वर्तुळे दूर होतात. आपण बदामाच्या वापराने देखील नॅचरल काजळ तयार करू शकता(Almond Oil Kajal For Dark Smoky Eyes).

बदामाचे काजळ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

कापसाची वात

मोहरीचे तेल

ड्राय स्किन-केस गळतीला वैतागलात? आंघोळीच्या पाण्यात टाका चमचाभर मीठ, मग पाहा जादू..

२ बदाम

 एक दिवा

अशा पद्धतीने तयार करा बदामाचा वापर करून काजळ

- एका दिव्यात मोहरीचे तेल आणि २ बदाम घाला. नंतर त्यात कापसाची वात लावून पेटवा. नंतर दोन वाट्या जवळ ठेवा. नंतर प्लेटच्या मदतीने दिवा झाकून ठेवा. थोडा वेळ राहू द्या. जसजसे बदाम जळतील तसतसे प्लेटवर काजळ जमा होण्यास सुरवात होईल. थोड्या वेळानंतर प्लेट काढा. त्यावर काळा थर जमा झालेला पाहायला मिळेल.

हिवाळ्यात केसांना मेहेंदी लावली तर तब्येत बिघडते? मेहेंदी भिजवतानाच मिसळा ४ गोष्टी, केसांना सुंदर रंग

- नंतर एका चमच्याच्या मदतीने काजळ एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यात एक थेंब बदमाचे तेल घालून मिक्स करा. तयार काजळ एका लहानश्या डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे काजळ लावण्यासाठी रेडी. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या काजळचा वापर करू शकतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी