Join us  

रात्री चेहऱ्यावर 'या' तेलाचे २ थेंब लावून झोपा, त्वचेची समस्या होईल कमी, सकाळी दिसाल फ्रेश - सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 9:57 PM

Almond Oil Will Give Your Skin a Rejuvenated Glow मुरुमांचे डाग, सुरकुत्या, ड्राय स्किनची समस्या होईल छुमंतर, रात्री फक्त २ थेंब या तेलाचे लावून झोपा

बदामाचे योग्य पद्धतीनं उपयोग केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने बुद्धी शार्प व आरोग्याला अनेक पौष्टीक घटक मिळतात. बदामाचे तेल केसांसाठी फायदेशीर ठरते. यासह चेहऱ्यावरील सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करते. एका चिमुकल्या बदामाचे गुणधर्म आपल्या शरीराला उर्जा देतात. बदामाच्या तेलामुळे चेहऱ्याचा रंग आणि पोत चांगला राहण्यास मदत होते.

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, लोह, मॅगनिझ, फॉस्फोरस आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात आहेत. हे सर्व घटक त्वचा आणि केसांसाठी पोषक आहेत. नियमित रात्रीच्यावेळी बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने, त्वचा खुलून - तजेलदार दिसते. चला तर मग बदामाच्या तेलाचा नक्की वापर कसा करावा हे पाहूयात(Almond Oil Will Give Your Skin a Rejuvenated Glow).

बदाम तेल चेहऱ्यावर कोणी लावावे कोणी टाळावे?

आपण आपल्या चेहऱ्यावर बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. आपली त्वचा सेंसेटिव्ह असेल तर, पॅच चाचणी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचा वापर करा. कारण प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते. त्यानुसार आपल्या चेहऱ्यावर बदामाच्या तेलाचा वापर करा.

चेहऱ्यावर बदाम तेलाचा वापर कसा करावा?

चेहऱ्यावर बदाम तेल लावण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा.

असे केल्याने त्वचेवरील घाण साफ होईल आणि तेल त्वचेत चांगले शोषले जाईल.

आता कॉटन पॅड किंवा कापूस तेलात भिजवा. आता कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर तेल लावा.

आपण रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर बदामाचे तेल लावून झोपून शकता. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.

केसांची वेणी दिसेल जाड, कांद्याचा करा हेअर सीरम, केसांची समस्या होईल छुमंतर

चेहऱ्यावर बदाम तेल लावण्याचे फायदे

सकाळी उठल्यानंतर चेहरा व डोळे सुजलेले दिसतात. ताण - तणावामुळे चेहरा खूप थकलेला दिसतो. डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी आपण बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. बदामाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. डोळ्यांखाली तेल लावून थोडा वेळ चोळा. रोज असे केल्याने डोळ्यांची समस्या दूर होईल.

डागांची समस्या होईल कमी

मुरुमांचे डाग घालवण्यासाठी आपण बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे डार्क स्पॉट्स व मुरुमांचे डाग कमी करण्यास मदत करतात.

२ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

सुरकुत्या होतील कमी

वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अँटी रिंकल क्रीमऐवजी बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्याची समस्या कमी होते. या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. असे केल्याने तेल त्वचेत सहज शोषले जाईल. काही वेळानंतर चेहरा धुवा. या तेलाचा वापर नियमित चेहऱ्यावर करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी