Join us  

मान-चेहरा काळा पडला? फक्त १० रूपयांत घरीच करा हे फेशियल, ग्लोईंग-स्पॉटलेस दिसेल त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 6:18 PM

Aloe vera for face uses and benefits : पार्लरला जाऊन फेशियल करणं प्रत्येकवेळी शक्य होतंच असं नाही. अशावेळी एलोवेरा फ्रेस ट्रिटमेंट म्हणजेच एलोवेरा फेशियल तुमचं काम सोपं करू शकतं.

आपली त्वचा ग्लोईंग दिसावी, पिंपल्स येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. पण बदलत्या वातावरणामुळे आणि वेगवेगळ्या उत्पादनांच्या वापरामुळे चेहरा टॅन होतो. महागडया क्रिम्स आणि इतर सौंदर्य उत्पादनांच्या वापरानंतही हवातसा ग्लो  चेहऱ्यावर दिसत नाही. ( Do aloe vera facial at home for healthy, glowing skin in just 10 rs)

अशावेळी बऱ्याच महिला पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून फेशियल करतात. जर तुम्हाला पार्लरमध्ये पैसे घालवायचे नसतील घरच्याघरी सोपे उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. पार्लरला जाऊन फेशियल करणं प्रत्येकवेळी शक्य होतंच असं नाही. अशावेळी एलोवेरा फेस ट्रिटमेंट म्हणजेच एलोवेरा फेशियल तुमचं काम सोपं करू शकतं. (Aloe vera for face uses and benefits)

एलोवेरा फेशियल

एलोवेरा फेशियल क्रिम बनवण्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल, तांदळाचं पीठ, मध आणि कॉफीची आवश्यकता असेल. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यानं  ग्लो येईल. याशिवाय तुम्ही वयापेक्षा लहान दिसाल. हे एक उत्तम एक्सफोलिएटरचं काम करते. फेशियल  करण्यासाठी एलोवेराचा एक मोठा तुकडा कापून  घ्या. त्यानंतर पानं व्यवस्थित स्वच्छ करून जेल काढून घ्या.  एलोवेरावर एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा मध घाला त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला जवळपास ५ मिनिटं स्क्रब करा. यामुळे  स्किन ग्लोईंग दिसेल आणि व्यवस्थित एक्सफोलिएट होईल. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा.

एलोवेरा आणि कॉफी

दुसरा उपाय म्हणजे एक एलोवेराचं पान घ्या आणि त्यावर १ चमचा कॉफी पावडर घाला आणि फेसवर व्यवस्थित मसाज करा. जवळपास ४ ते ५ मिनिटं मसाज करा.  ५ मिनिटं तसंच चेहऱ्याला तसंच लावलेले राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवा. कॉफी चेहऱ्याचं टॅनिंग दूर करेल. हे फेशियल तुम्ही आठवड्यातून २ वेळा करू शकता. स्किन टाईटनिंगसाठी तुम्ही एलोवेरा फेसपॅकचा वापर करू शकता.  यासाठी एलोवेरा जेल, चंदन पावडर, मध आणि  एकत्र करा. १५ ते २० मिनिटांसाठी सुकवा नंतर चेहरा स्वच्छ धुवा. मग चेहऱ्यावर मॉईश्चरायजर किंवा सिरम लावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी