Join us  

१ चमचा कोरफड जेलमध्ये मिक्स करा ‘एक’ खास पदार्थ, केस गळत होते हेच विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 6:36 PM

Aloe Vera Gel For Hair Fall - Control Hair Loss With Aloe Gel केस गळतीने हैराण झाला असाल तर हा एक सोपा उपाय करुन पाहा

प्रत्येकाला असे वाटते की त्यांचे केस लांब, दाट व काळेभोर दिसावे. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केस गळणे, केसात कोंडा, केस अकाली पांढरे होणे, या समस्यांमुळे लोकं हैराण आहेत. केसांची निगा राखण्यासाठी आहारासह योग्य प्रॉडक्ट्सचा वापर करणे गरजेचं आहे. काही प्रॉडक्ट्समुळे केस अधिक खराब होतात. आजकाल लोकं नैसर्गिक उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करत आहे. जर आपल्याला केस गळतीची समस्या सोडवायची असेल तर, एलोवेरा जेलचा वापर करून पाहा. एलोवेरा जेलच्या हेअर मास्कमुळे केस गळतीसह अनेक समस्या सुटतील.

एलोवेरा जेल हे स्किनसाठी उपयुक्त ठरत असून, केसांसाठी देखील फायदेशीर ठरते. एलोवेरा जेल हे जीवनसत्त्वे, अमीनो ऍसिडस् आणि खनिजांनी परिपूर्ण आहे. ज्यामुळे केसांना नवीन जीवनदान मिळते. केसांसाठी जर एलोवेरा जेलचा वापर करायचा असेल तर, यात एक गोष्ट मिसळून केसांवर लावा. याने नक्की फरक दिसेल(Aloe Vera Gel For Hair Fall - Control Hair Loss With Aloe Gel).

केसांवर एलोवेरा जेल लावण्याचे योग्य प्रकार

एलोवेरा हेअर मास्क करण्यासाठी लागणारं साहित्य

एलोवेरा जेल

ग्रीन - टी

आठवड्यात किती वेळा केस धुणे योग्य? सतत धूत असाल तर किंवा आठवड्यातून एकदाच नहात असाल तर..

अशा पद्धतीने करा हेअर मास्क

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा, पाणी गरम झाल्यानंतर त्यात ग्रीन - टी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. व पाणी थंड होण्यासाठी ठेवा. मिक्सरच्या भांड्यात एलोवेरा जेल घाला व त्यात ग्रीन - टीचं पाणी घालून पेस्ट तयार करा.

ही तयार पेस्ट एका वाटीमध्ये काढून ठेवा. व हाताने ही पेस्ट आपल्या स्काल्पवर व केसांवर लावा. ३० मिनिटे ही पेस्ट केसांवर लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. ही प्रक्रिया आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता. याने केसांचे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होते, व केस काळेभोर, दाट दिसतात.

ग्रीन - टी - एलोवेरा जेलचे फायदे

ग्रीन टीमध्ये आढळणारे पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन के, रिबोफ्लेविन, थायमिन, मॅंगनीज, पोटॅशियम, कॉपर, लोह, पॉलिफेनॉल आढळते. जे केसांसाठी फायदेशीर आहे. 

कापूर करतो केसांवर जादू, ५ रुपयाच्या कापराचा पाहा सोपा उपाय

एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, क्रोमियम, कॅल्शियम, कॉपर, पोटॅशियम, बी1, बी2, बी3, बी6, झिंक, फॉलिक अॅसिड, लोह, सोडियम, मॅंगनीज आढळते. जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडी