Join us

ना दिसतील पिंपल्स, ना राहतील सुरकुत्या; फक्त तुरटी आणि लिंबाचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:06 IST

Alum And Lemon For Skin :तुरटीमध्ये अनेक प्रकारचे अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-बायोटिक्स, अ‍ॅंटी-फंगल गुण असतात. ज्यांच्या मदतीनं त्वचा आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तसेच लिंबामध्येही व्हिटॅमिन सी भरपूर असतं.

Benefits of Alum And Lemon : तुरटीचा वापर फार पूर्वीपासून त्वचेसंबंधी आणि आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. तुरटीमध्ये अनेक प्रकारचे अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-बायोटिक्स, अ‍ॅंटी-फंगल गुण असतात. ज्यांच्या मदतीनं त्वचा आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तसेच लिंबामध्येही व्हिटॅमिन सी भरपूर असतं. तसेच यात अनेक प्रकारचे अ‍ॅंटी-बायोटिक्स, अ‍ॅंटी-फंगल गुणही असतात. अशात तुरटी आणि लिंबाचा एकत्र वापर केला तर अनेक फायदे मिळू शकतात.

चेहऱ्यावरून डेड स्कीन निघेल

चेहऱ्यावरील डेड स्कीन दूर करण्यासाठी तुरटी आणि लिंबाच्या रसाचा वापर केला जाऊ शकतो. या उपायानं त्वचेवरील डेड स्कीन दूर होऊन त्वचा आतपर्यंत स्वच्छ होते. यासाठी लिंबाचा रस आणि तुरटीचं मिश्रण तयार करा आणि ते चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं मसाज करा. मसाज केल्यावर चेहराही उजळेल.

डाग होतील दूर

तुरटी आणि लिंबाचा वापर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. तुरटी आणि लिंबानं त्वचेचा रंगही खुलतो. सोबतच डागही दूर होतात. इतकंच नाही तर पुरळ-पिंपल्स दूर करण्यासही यानं मदत मिळते.

केसांची चमक वाढेल

तुरटी आणि लिंबाचा वापर जर तुम्ही केसांसाठी केला तर केसांची चमक वाढते. या मिश्रणानं केस सॉफ्ट होतात आणि काळे राहण्यास मदत मिळते. सोबतच पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते.

कोंडा होईल दूर

तुरटी आणि लिंबाच्या रसाचा वापर करून केसांमध्ये चिकटून बसलेला कोंडाही दूर केला जाऊ शकतो. यात अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच डोक्याच्या त्वचेवर जमा होणारे नुकसानकारक बॅक्टेरियाही नष्ट होतात.

सुरकुत्या होतील दूर

कमी वयातच चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या दूर करण्यासाठी तुरटी आणि लिंबाचा वापर करू शकता. याचा वापर तुम्ही चेहऱ्यावर फेस पॅकच्या रूपात करू शकता. यानं त्वचा टाइट राहते आणि रोमछिद्र कमी करण्यास मदत मिळते.

कसा कराल वापर?

लिंबू आणि तुरटीचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी १/४ चमचा तुरटीचं पावडर घ्या, त्यात २ ते ३ चमचे लिंबाचा रस मिक्स करा. यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटं तसंच ठेवा. नंतर चेहरा पाण्यानं धुवून घ्या. केसांवरही अशाच प्रकारे याचा वापर करू शकता. 

टॅग्स :त्वचेची काळजीकेसांची काळजी