उन्हाळ्यात, लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्त जागरूक असतात. कारण उन्हामुळे त्वचा खूप कमी वेळेत काळी होते. टॅनिग निघण्यासाठी अनेकदा उपाय करूनही हवातसा बदल दिसत नाही. याशिवाय शरीरातील उष्णता वाढल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं ते वेगळंच. तुरटीचा वापर अंघोळीच्या पाण्यात केल्यास तुमच्या त्वचेसह शरीराला बरेच फायदे मिळू शकतात. सौंदर्य प्रसाधनांमध्ये पूर्वीपासून तुरटीचा वापर केला जातो. आज, या लेखाच्या माध्यमातून पाण्यामध्ये तुरटी घालून अंघोळीचे काही फायदे सांगणार आहोत.
शेव्हिंग केल्यानंतर साधारणपणे तुरटीचा वापर केला जातो. असे बरेच लोक आहेत जे शेव्हिंग केल्यावरच तुरटीचा वापर प्रभावी मानतात. याशिवाय पाण्यामध्ये तुरटी टाकून आंघोळ केल्याने केस गळणे कमी होते. यामुळे तुमच्या शरीरातील घाण तसेच शरीरातून बाहेर येणाऱ्या घामामुळे येणारा दुर्गंधी दूर होतो. टाळूवरची घाण काढून टाकून तुरटी टाळू साफ करते.
डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं अगदी सोप्पंय! फक्त नाश्ता किती वाजता करायचा हे माहित करून घ्या
दुसरीकडे, जर तुम्ही त्याच्या इतर फायद्यांबद्दल बोललात तर ते तुम्हाला दमा, खोकला, दातांच्या समस्यांपासूनही आराम देते. जर तुरटी गरम पाण्यात मिसळली तर ती सहज विरघळते, यामुळे हे पाणी आंघोळ करताना सहजपणे तुमच्या त्वचेत आणि केसांमध्ये शोषले जाते आणि अनेक फायदे मिळतात.
१) घामाचा वास येत नाही
उन्हाळ्यात घामाचा वास एखाद्या समस्येपेक्षा कमी नसतो. अनेकदा आंघोळ केल्या केल्या घाम येणे सुरू होते. अशावेळी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. तुरटीमध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातून येणाऱ्या घामाचा दुर्गंधी थांबवण्याचे काम करतात. जर तुम्हाला घामाच्या वासापासून सुटका करायची असेल तर तुरटी फोडून किंवा पाण्यात बारीक करून ती टाका. त्यानंतर आंघोळ करा. तुरटी तुमच्यासाठी एस्ट्रींजंटसह नैसर्गिक परफ्यूम म्हणून काम करते.
शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय; झटक्यात कमी होईल
२) केसांची वाढ
केसांच्या वाढीसाठीही तुरटी खूप फायदेशीर आहे. तुरटीमध्ये पोटॅशियम आणि सोडियम आढळतात, जे त्वचा सोलल्यानंतर किंवा खरचटल्यानंतर लावण्यासाठी प्रभावी ठरते. त्याचबरोबर तुरटी तुमचे केस वाढणे आणि केस पांढरे होण्याच्या समस्येपासून देखील संरक्षण करते. यासाठी तुम्ही तुरटी बारीक करून त्यात गुलाबपाणी घाला. आता हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा. या पाण्यानं केस धुतल्यानं केसांची वाढ लवकर होण्यास मदत होईल.
३) युरीन इन्फेक्शनपासून आराम मिळतो
ज्या लोकांना अनेकदा युरिन इन्फेक्शनच्या तक्रारी असतात, त्यांनी विशेषतः तुरटी वापरावी. तुमचे खाजगी भाग स्वच्छ करण्यासाठी तुरटी हा उत्तम पर्याय मानला जातो. यामुळे युरिन इन्फेक्शन किंवा इतर प्रकारच्या संसर्गाची शक्यता कमी होते. तुरटीच्या पाण्याने दररोज आंघोळ करून, आपण सहजपणे आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेऊ शकता.
४) सांधेदुखीपासून आराम
तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणे एक प्रकारे वेदना निवारण थेरपीसारखेच मानले जाते. जसे गरम पाणी तुमच्या सांधे आणि मज्जाततूंसाठी चांगले असते, त्याचप्रमाणे गरम पाण्यात तुरटी टाकल्याने तुमचे दुखणे कमी होण्यास मदत होते. तुरटीत मॅंगनीज आढळते. मॅंगनीजमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे हाडांमध्ये सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.
५) तोंडाचा वास येत नाही
तुरटीच्या वापरानं तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे आपले तोंड स्वच्छ करण्यासाठी अधिक प्रभावी मानले जातात. त्यात असलेले तुरट गुणधर्म दातदुखी, दातांमध्ये रक्तस्त्राव रोखणे, दात स्वच्छ करणे यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. कोमट पाण्यात तुरटी घालून गुळण्या केल्यानं दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
६) त्वचेसाठी फायदेशीर
तुरटी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुरटीमध्ये तुरट गुणधर्म असतात, जे त्वचा घट्ट करण्याचे काम करतात. या पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही सहज कमी होतात. तुरटीचे पाणी तुम्हाला पिग्मेंटेशन आणि त्वचेवर पुरळ आणि लालसरपणा यासारख्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. आयुर्वेद मुरुम आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुरटी वापरण्याची शिफारस करते.