धुळ, प्रदूषण, जंक फूड, तणाव आणि वाईट जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Alum for Acne Treatment) प्रत्येक वयोगटातील लोकांना त्वचेच्या समस्या होत आहे. यामध्ये डाग, मुरुमे यांचे प्रमाण अधिक आहे. ( Benefits of Alum on Pimples) या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण महागातले उत्पादने चेहऱ्यावर लावतो. परंतु, त्यामुळे आपल्याला फारसा काही फरक पडत नाही. अनेकदा महागड्या उत्पादनामुळे चेहऱ्यावर अधिक खाज सुटू लागते,पिंपल्सचे प्रमाण वाढते.(Alum as a Pimple Treatment)
आई-आजीच्या बटव्यामध्ये किंवा आपल्या घरात तुरटी आपल्याला पाहायला मिळते. तुरटी फक्त पाण्यातील घाण स्वच्छ करण्यासाठी नाही तर चेहरा स्वच्छ करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. तुरटीला नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स आणि अॅक्नेपासून सुटका होऊ शकते. जाणून घेऊया तुरटी लावण्याची योग्य पद्धत.(Alum in Skincare for Pimples) तुरटी ही पोटॅशियम आणि अॅल्युमिनियम सल्फेटपासून बनलेला नैसर्गिक खनिज आहे. हे त्याच्या अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि तुरट गुणधर्मामुळे ओळखले जाते. त्यामुळे त्वचेच्या कोणत्याही विकारावर तुरटी प्रभावी ठरते. त्वचेचे छिद्र, मुरुमे, बॅक्टेरिया रोखते. त्वचेवरील जळजळ कमी करुन डाग हलके करण्यास मदत करते.
1. त्वचेसाठी तुरटीचे फायदे
- तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग हलके करण्यास मदत करतात. तसेच यामुळे त्वचेचा रंग सुधारतो.
- तुरटीच्या अँटीबॅक्टेरीयल गुणधर्मामुळे मुरुम निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. याच्या नियमित वापरामुळे मुरुमांची समस्या कमी होते.
- तुरटीमुळे त्वचेची छिद्रे आकुंचन पावण्यास आणि त्वचा घट्ट करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा चमकदार होते.
- यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.
2. तुरटी वापरण्याची पद्धत
- तुरटीचा तुकडा पाण्यात विरघळवा. चांगला विरघळल्यानंतर काही मिनिटे पाण्यात राहू द्या. हे पाणी स्वच्छ गाळून बाटलीत भरा. चेहरा धुण्यासाठी या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.
- याचा बारीक पावडर करा. गुलाब पाणी किंवा मधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. या पॅकमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास आणि चेहरा चमकण्यास मदत होईल.
- तुरटीचे पाणी टोनर म्हणूनही वापरता येऊ शकते. चेहरा धुतल्यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर तुरटीचे पाणी लावा. यामुळे त्वचेवरील छिद्र साफ होऊन त्वचा घट्ट होईल.