Join us  

फक्त ५ रूपयांची तुरटी वापरून पांढरे केस काळे करा; केस कायम राहतील काळेभोर, दाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 12:24 PM

Alum for Healthy Hair : जर तुम्हाला तुमचे केस पूर्वीसारखे दिसायला हवे असतील तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. तुम्हाला फक्त गुलाबपाण्यासोबत तुरटी पावडरची पेस्ट बनवायची आहे.

आजकाल केस गळण्याचा, पांढरे होण्याचा  त्रास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जाणवतो. बदलती  जीवनशैली, खाण्यापिण्यातील अनियमितता, पोषक घटकांचा अभाव यामुळे केस कोरडे होतात आणि गळतात. जर तुम्हाला वेगवेगळे शॅम्पू, तेलं वापरूनही केसांवर बदल जाणवत नसेल तर  काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.तुरटी केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. बाजारातून तुरटी सहज विकत घेता येते. तुम्ही पांढरे केस पुन्हा तरुण करण्यासाठी म्हणजेच ते काळे करण्यासाठी वापरू शकता. समजून घेऊया याचा केसांना कसा फायदा होतो. (How to get black hairs naturally)

गुलाबपाणी आणि तुरटी

जर तुम्हाला तुमचे केस पूर्वीसारखे दिसायला हवे असतील तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. तुम्हाला फक्त गुलाबपाण्यासोबत तुरटी पावडरची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट केसांना लावायची आहे. पेस्ट केसांवर लावल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. पेस्ट सुकल्यावर पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल. यामुळे तुमचे पांढरे केस पुन्हा काळे होतील आणि केसांना ताकदही मिळेल.

नारळपाणी आणि  तुरटी

खोबरेल तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे पण तुरटीसोबत वापरल्यास त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. यामुळे तुम्हाला दोन अद्वितीय फायदे मिळतील. प्रथम ते तुमचे केस काळे करेल. दुसरे म्हणजे, ते तुमच्या स्कॅल्पची छिद्रे उघडेल, ज्यामुळे केसांची लवकर वाढ होईल आणि केसांची वाढ चांगली होईल.

काही लोकांना हिवाळ्यात कोंड्याची समस्या अधिक वाढल्याचे दिसून येते. तुरटी पावडर वापरून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. तुम्हाला फक्त ते पाण्यात मिसळून टाळूवर लावायचे आहे. यामुळे तुमची स्कॅल्प साफ होईल आणि तुम्हाला कोंडा देखील दूर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी