Lokmat Sakhi >Beauty > Alum for Skin : फक्त ५ रुपयांची तुरटी वापरून मिळवा ग्लोईंग, डागविरहीत चेहरा; डाग, काळपटपणा होईल दूर

Alum for Skin : फक्त ५ रुपयांची तुरटी वापरून मिळवा ग्लोईंग, डागविरहीत चेहरा; डाग, काळपटपणा होईल दूर

Alum for Skin : तुरटी ठेचून ती पाण्यात चांगली विरघळवा. या पाण्यानं चेहरा धुवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर, पाठीवर किंवा इतर कोणत्याही भागावरील मुरुम सुकतात आणि हळूहळू नाहीसे होऊ लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:37 AM2022-09-27T11:37:21+5:302022-09-27T11:52:47+5:30

Alum for Skin : तुरटी ठेचून ती पाण्यात चांगली विरघळवा. या पाण्यानं चेहरा धुवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर, पाठीवर किंवा इतर कोणत्याही भागावरील मुरुम सुकतात आणि हळूहळू नाहीसे होऊ लागतात.

Alum for Skin : How to use alum or fitkari to get acne and pimples free skin | Alum for Skin : फक्त ५ रुपयांची तुरटी वापरून मिळवा ग्लोईंग, डागविरहीत चेहरा; डाग, काळपटपणा होईल दूर

Alum for Skin : फक्त ५ रुपयांची तुरटी वापरून मिळवा ग्लोईंग, डागविरहीत चेहरा; डाग, काळपटपणा होईल दूर

तुरटीचा वापर सर्रास नाभिकाच्या दुकानात केला जातो. याशिवाय तुरटीचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, ज्यामुळे त्वचा मुरुमांपासून मुक्त तर होतेच याशिवाय त्वचेची हरवलेली चमकही परत येते. (Alum for Skin) इतकंच नाही तर ते त्वचेचा रंगही सुधारतो आणि डागही दूर होतात. तुरटीचा वापर करून तुम्ही त्वचा उजळवू शकता.  (How to use alum or fitkari to get acne and pimples free skin)

एक्ने दूर करा

तुरटी ठेचून ती पाण्यात चांगली विरघळवा. या पाण्यानं चेहरा धुवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर, पाठीवर किंवा इतर कोणत्याही भागावरील मुरुम सुकतात आणि हळूहळू नाहीसे होऊ लागतात. तसेच त्वचा गुळगुळीत होण्यास मदत होईल. तुम्ही ओल्या चेहऱ्यावर तुरटी चोळू शकता. रात्रभर राहू द्या. यामुळे मुरुम कोरडे होतील आणि जर मुरुम असतील तर ते लहान दिसू लागतील. तुरटी ठेचून एका भांड्यात ठेवा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि नंतर चेहऱ्यावर मसाज करा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग तसेच पिंपल्समुळे होणारे डाग हलके करण्यास मदत करेल. तसेच, हे स्किन लाइटनिंग टॅनिंगमध्ये देखील उपयुक्त ठरू शकते.

पोट, कंबरेचा आकार कमीच होत नाहीये? १० टिप्स, वजन झरझर घटेल, मेंटेंन दिसाल

स्किन टाईटनिंगसाठी उपयुक्त

वयानुसार तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुरटी त्वचेला चांगलं बनवू शकते.  तुम्हाला फक्त त्याची पावडर गुलाब पाण्यात मिसळायची आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचे मिश्रण स्प्रे बाटलीतही भरू शकता. हे पाणी दिवसातून दोनदा लावा. तुम्ही हे सतत करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

अरे व्वा! फक्त ३ महिन्यात ब्लड शुगर नियंत्रणात आणेल हे नवं औषध; AIIMS तज्ज्ञांचा दावा

उजळदार त्वचेसाठी

तुरटी पावडर मुलतानी मातीत मिसळा. त्यात गुलाबजल टाकून ओली पेस्ट तयार करा. मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. हे मिश्रण त्वचेचा रंग सुधारण्यासाठी काम करेल.

Web Title: Alum for Skin : How to use alum or fitkari to get acne and pimples free skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.