Join us  

पावसाळ्यात केसांचं गळणं जास्त वाढतं, करा ५ रुपयांच्या तुरटीचा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 1:21 PM

Alum or fitkari for hair and skin: Find out the benefits केस रुक्ष होतात, गळतात त्यासाठी हा एक खास आणि सहजसोपा उपाय

जुन्या काळात तुरटीचा वापर केस व त्वचेसाठी केला जायचा. तुरटीचा वापर करून चेहरा व केस या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येते. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांपासून सुटका मिळवून देतात. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या निगडीत समस्या वाढत चालल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकता.

काही लोकं महागड्या प्रॉडक्ट्सवर विश्वास ठेवतात. तर काही नैसर्गिक उपायांचा वापर करून केसांची निगा राखतात. ज्यामुळे केसांच्या समस्या सुटतात. केसांची वाढ, कोंडा, केस अकाली पांढरे होणे, यावर उपाय म्हणून आपण तुरटीचा वापर करू शकता. पण केसांसाठी तुरटीचा वापर नक्की कसा करावा? केसांची निगा राखण्यासाठी तुरटी उपयुक्त ठरते का? हे पाहूयात(Alum or fitkari for hair and skin: Find out the benefits).

मेहंदी लावा, डाय करा, कलर करा -केस पांढरेच? घ्या, खास आयुर्वेदिक उपाय-केस होतील काळे

केसांच्या वाढीसाठी तुरटी ठरते उपयुक्त

पोटॅशियम आणि सोडियमने समृद्ध तुरटी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. यासाठी खोबरेल तेलात तुरटीची पावडर मिक्स करून लावा. यामुळे केसांची वाढ होईलच, यासह केस काळेभोर घनदाट दिसतील. तुरटीमुळे स्काल्पवरील पोर्स उघडण्यास मदत करतात. ज्यामुळे केसांची वाढ होते. कोंडा देखील कमी होते. याशिवाय आपण तुरटी पाण्यात मिसळून केस धुवू शकता.

खा तूप मिळेल रुप! चेहऱ्यासह ओठ आणि हातपायांना तूप लावण्याचे ५ फायदे

कोंडा दूर करण्यासाठी करा तुरटीचा वापर

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध तुरटी स्काल्पची स्वच्छता करते. यासाठी तुरटी एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. जर आपल्याकडे तुरटीची पावडर असेल तर, एक मग पाण्यात ३ चमचे तुरटी पावडर मिक्स करून स्काल्पवर लावा. व स्काल्प चांगले चोळून स्वच्छ करा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. यामुळे स्काल्प स्वच्छ होईल. व कोंड्याचीही समस्या दूर होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी