हलकी गुलाबी थंडी आता अनेक ठिकाणी जाणवू लागली आहे. काहींना हिवाळा आवडतो, तर अनेकांना काही कारणास्तव आवडत नाही. कारण हिवाळ्यात स्किन रफ, काळपट पडू लागते. ज्यामुळे स्किनच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. तर अनेक वेळा स्किन इन्फेक्शन, स्किन पिग्मेंटेशनची समस्या निर्माण होते.
जर हिवाळ्यात थंडीमुळे आपली स्किन कोरडी आणि काळपट पडली असेल तर, तुरटीचा वापर करून पाहा. तुरटीतील अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म स्किनसाठी फायदेशीर ठरतात. जर आपण देखील हिवाळ्यातील स्किन प्रॉब्लेम्सपासून त्रस्त असाल तर, तुरटीचा वापर करून पाहा(Alum powder for skin: 3 ways to use it for acne scars).
तुरटी आणि गुलाब जल
तुरटी आणि गुलाब जलचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकता. मुख्य म्हणजे स्किन पिग्मेंटेशनचे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी एका बाऊलमध्ये तुरटीची पावडर घ्या, त्यात समप्रमाणात गुलाब जल मिक्स करा. तयार पेस्ट त्वचेवर लावा. १५ मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा क्लिन होईल.
तुरटी आणि खोबरेल तेल
तुरटी आणि खोबरेल तेलाचा वापर आपण दोन प्रकारे करू शकता. स्किन जर कोरडी झाली असेल तर, एका वाटीत तुरटीची पावडर घ्या, त्यात समप्रमाणात खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून काही वेळाने धुवून घ्या.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? दह्यात एक पदार्थ मिसळून रोज खा,पाहा केसात सुंदर फरक
दुसरी पद्धत म्हणजे एका वाटीत तुरटी पावडर, खोबरेल तेल आणि एक चमचा साखर घालून साहित्य एकजीव करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. १० मिनिटानंतर कापडाने पेस्ट पुसून काढा. यामुळे चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनचे डाग निघून जातील.
तुरटी आणि ग्लिसरीन
तुरटी अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. जी त्वचेला आतून पोषण देते. तर, ग्लिसरीन ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तुरटी आणि ग्लिसरीन एकत्र मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनचे डाग कमी होतात. शिवाय त्वचा कोरडी राहत नाही. यासाठी एका वाटीत तुरटीची पावडर घ्या, त्यात समप्रमाणात ग्लिसरीन मिक्स करून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.