Join us  

केस गळतात-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज खा 'हे' दाणे-भरभर केस वाढण्याचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2024 10:10 AM

Amazing benefits of fenugreek seeds for hair : टक्कल पडले म्हणून घाबरू नका, पिवळ्या दाण्यांचा एक सोपा उपाय करून पाहा..

जर आपले केस कमी वयातच गळू लागले असतील, शिवाय केसांची योग्य वाढ (Hair Care Tips) होत नसेल तर, वेळीच केस आणि लाईफस्टाईलकडे लक्ष द्यायला हवे. बिघडलेली जीवनशैलीमुळे केसांचे फार नुकसान होते. केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. बऱ्याचदा केमिकल रसायनयुक्त उत्पादनांमुळे केस गळतात. काही महिला केसांची समस्या वाढल्यावर ब्यूटी पार्लरच्या दिशेने धाव घेतात. पण केसांच्या समस्या वाढल्या की आहाराकडेही लक्ष द्यायला हवे. शरीरात व्हिटॅमिन आणि खनिजांच्या कमतरतेमुळेही केसांची समस्या वाढते (Fenugreek Seeds).

केसांची योग्य वाढ व्हावे असे वाटत असेल तर, मेथी दाण्यांचा सोपा उपाय करून पाहा. आहारात मेथी दाण्यांचा समावेश केल्याने केसांची योग्य वाढ होईल(Amazing benefits of fenugreek seeds for hair).

रात्री की सकाळी? केस नक्की केव्हा धुवावे? रात्री केस धुणे चूक हे खरे की खोटे

केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे

मेथीमध्ये फॉलिक ॲसिड, रिबोफ्लेविन, कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी, बी६ सारखे घटक आढळतात. जे केसांच्या मुळांना निरोगी बनवून नवीन केस वाढण्यास मदत करतात. जर आपण मोड आलेले मेथी दाणे खात असाल तर, याचा थेट फायदा केसांना होऊ शकतो.

काखेतल्या काळपट डागांमुळे स्लिव्हजलेस ड्रेस घालणं टाळताय? ३ नैसर्गिक उपाय-दिसेल झ्टपट बदल

मोड आलेले मेथी दाणे कसे खावे?

मेथी दाण्यातील घटक केसांना पोषण देते. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात मेथी दाणे घालून रात्रभर भिजत ठेवा. सकाळपर्यंत मेथी दाण्याला मोड येतील. त्यातील पाणी वगळून मेथी दाण्यांचा वापर आपण सॅलॅड, भाजी किंवा इतर आवडत्या पदार्थांमध्ये मिक्स करून खाऊ शकता. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स