सध्याच्या काळात स्ट्रेस, बदलती लाईफस्टाईल, प्रदूषण यांसारख्या अनेक समस्यांमुळे केसगळतीची मोठी समस्या अनेकांना सतावत आहे. या केसांच्या समस्यांवर आपण अनेक घरगुती किंवा आर्टिफिशियल उपाय करून पाहतो. परंतु काहीवेळा या उपायांचा केसांच्या समस्यांवर काही अंशी फरक पडतो. असे असले तरीही या समस्या संपूर्णपणे नाहीशा होत नाहीत. अशावेळी काही घरगुती जुने उपचार किंवा आजीबाईत्या बटव्यातील खास उपाय करून पाहिले जातात(Fenugreek Seeds For Healthier Hair).
केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी दाणे हे वरदान ठरतात. आयुर्वेदात मेथीच्या दाण्यांना फार मोठे महत्व आहे. या इवलुशा मेथीच्या बियांमुळे केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. मेथी दाण्यांच्या (Methi dana for hair) वापरामुळे केसांचे बिघडलेले आरोग्य व हरवलेले सौंदर्य आपण पुन्हा आणू शकतो. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फक्त ते कसे वापरायचे हे माहित असणे आवश्यक आहे. केसांसाठी मेथी दाणे योग्य पद्धतीने वापरल्यास केसांच्या अनेक समस्या या कायम दूर होऊ शकतात. केसांचे चांगले आरोग्य व सौंदर्यासाठी मेथी दाण्यांचा वापर नेमका कसा करावा, ते पाहूयात(How To Apple Methi On Hair For Hair Growth).
केसांसाठी मेथीचे दाणे वापरण्याच्या ४ सोप्या पद्धती कोणत्या ?
१. मेथीच्या दाण्याचे पाणी :- चमचाभर मेथीचे दाणे पाण्यांत रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून त्यातील मेथीदाणे बाजूला काढून फक्त त्याचे पाणी घ्यावे. हे पाणी केसांच्या मुळांना व स्कॅल्पला लावून हलक्या हातांनी मसाज करुन घ्यावा. तासभर हे केसांना लावून तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे केस मजबूत होतील आणि त्यांना चमक येईल.
२. मेथी दाण्यांचे तेल :- मेथीच्या दाण्यांचे तेल बनवण्यासाठी, एका बाऊलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात चमचाभर मेथीचे दाणे घालून हे दोन्ही एकत्रित करून गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावेत. त्यानंतर हे तेल थोडे कोमट झाल्यावर केसांच्या मुळाशी व स्कॅल्पला लावून घ्यावे. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल केसांना लावून हलक्या हातांनी मालिश करून घ्यावे. यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते.
लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय...
३. मेथी दाण्यांची पेस्ट :- केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मेथी दाण्यांची पेस्ट आपण केसांना लावू शकतो. मेथी दाण्यांची पेस्ट बनवण्यासाठी २ ते ३ टेबलस्पून मेथी घेऊन ते कपभर पाण्यांत रात्रभरासाठी भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी मेथी दाणे भिजवलेले पाणी व मेथी दाणे एकत्रित करून ते मिक्सरला बारीक वाटून त्यांची पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट थेट स्कॅल्प आणि केसांच्या मुळांशी चोळून लावून घ्यावी. ही मेथी पेस्ट केसांवर तशीच २० मिनिटे राहू द्यावीत. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून २ वेळा केल्यास केस घनदाट, लांबसडक, मजबूत होण्यास मदत मिळते.
४. मेथी हेअर मास्क :- मेथीच्या दाण्यांचा वापर करून आपण हेअर मास्क देखील बनवू शकतो. ३ टेबलस्पून मेथीचे दाणे घेऊन ते रात्रभर पाण्यांत भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी हे मेथी दाणे वाटून त्यांची पेस्ट बनवून घ्यावी. या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिक्स करून घ्यावा. अशाप्रकारे मेथी दाणे व लिंबाच्या रसाचा हेअर मास्क बनवून आपण केसांना लावू शकतो. हा हेअर मास्क केसांच्या मुळांशी लावून अर्धा तास तसाच ठेवावा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा हेअर मास्क केसांना लावल्यामुळे हेअर ग्रोथ चांगली होण्यासोबतच केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.