Join us  

रात्री चेहऱ्याला 'हा' पदार्थ लावून झोपा; सकाळी चेहऱ्यावर आलेलं असेल तेज, त्वचा टवटवीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 11:34 AM

Amazing Benefits Of Using Night Creams : नाईट क्रिम पूर्ण रात्रभर त्वचेवरम काम करते. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज होते आणि त्वचेत सॉफ्टनेस येतो.  फाईन लाईन्स कमी करण्यासाठी नाईट क्रिम एक उत्तम उपाय आहे.

जर तुम्ही  हेल्दी डाएट आणि हेल्दी  स्किन  केअर रूटीन फॉलो केलं तर चेहऱ्यावर पिंपल्स, एक्ने, डार्क स्पॉट्स, पिग्मेटेंशन, सुरकुत्या यांसारख्या समस्या येणार नाहीत. स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही रात्री त्वचेला काय लावता ते फार महत्वाचं असतं. (Amazing Benefits Of Using Night Creams) होममेड नाईट क्रिम त्वचेवरील सुरकुत्या, डाग काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरेल. ही क्रिम बनवण्यासाठी तुम्हाला घरी उपलब्ध असणारं सामान लागेल. (How to Choose the Best Night Cream) यामुळे त्वचा रिपेअर होण्यास मदत होते.

साहित्य

शिया बटर -१ चमचा

 सदाफुली- ६ ते ७ फुलं

गुलबपाणी- २ ते ३ चमचे

एलोवेरा - १ ते २ चमचे

ही क्रिम बनवण्यासाठी सगळ्यात आधी फुलं व्यवस्थित धुवून घ्या. आता फुलं मिक्सरमध्ये घाला आणि त्यात  गुलाबपाणी घालून व्यवस्थित दळून घ्या. या फुलांचा रस एका भांड्यात गाळून घ्या. आता शिया बटर व्यवस्थित वितळवून घ्या आणि त्यात एलोवेरा जेल  घालून व्यवस्थित मिक्स करा. या दोन्ही प्रकारचे मिश्रण एका भांड्यात भरा. तयार आहे  होममेड क्रिम. ही नाईट क्रिम चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या.

नाईट क्रिम लावण्याचे फायदे

नाईट क्रिम पूर्ण रात्रभर त्वचेवर काम करते. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज होते आणि त्वचेत सॉफ्टनेस येतो.  फाईन लाईन्स कमी करण्यासाठी नाईट क्रिम एक उत्तम उपाय आहे.  या क्रिमच्या वापराने डार्क सर्कल्स बरेच कमी होतात. त्वचेचा ड्रायनेस कमी होतो आणि त्वचा हायड्रेट राहते. म्हणून रोज न चुकता नाईट क्रिम लावायला हवी. वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी नाईट क्रिम फायदेशीर ठरते. नाईट क्रिममुळे त्वचेवर लवचिकता टिकून राहते.  यामुळे टॅनिंग, सनबर्न, पिंपल्सचे डाग कमी होतात. 

बाजारातून नाईट क्रिम घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

१) नाईट क्रिम खरेदी करताना  काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कारण चुकीचे प्रोडक्ट्स त्वचेला नुकसान पोहोचवू शकता.  जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस्ड क्रिम घ्या. ज्यामुळे त्वचेतील एक्स्ट्रा ऑईल कमी होईल.

२) क्रिम जास्त घट्ट असू नये.  यामुळे त्वचेचे पोर्स बंद होतात आणि पिंपल्स येतात. जर तुम्ही हर्बल नाईट क्रिमचा वापर केला तर त्वचेसाठी उत्तम ठरतं. नाईट क्रिम जास्त सुंगधित असू नये. अन्यथा एलेर्जिक रिएक्शन्स येऊ शकतात.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी