Lokmat Sakhi >Beauty > आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

Be Dark Circle Free With These Under Eye Masks : डार्क सर्कलवर महागडे उपाय करण्यापेक्षा हा घरगुती आय मास्क वापरुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 07:10 PM2023-05-05T19:10:41+5:302023-05-05T19:30:26+5:30

Be Dark Circle Free With These Under Eye Masks : डार्क सर्कलवर महागडे उपाय करण्यापेक्षा हा घरगुती आय मास्क वापरुन पाहा.

Amazing Eye Masks to Get Rid of Dark Circles and Tired Eyes | आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

सध्याची ही वेगवान जीवनशैली आपल्याला सगळ्यांसाठीच नेहमी नवीन नवीन आव्हान समोर घेऊन येते. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण कंम्प्युटर  किंवा लॅपटॉपच्या समोर बसून १० ते १२ तास काम करतो. दिवसभर सतत कंम्प्युटर किंवा लॅपटॉपकडे बघत काम केल्याने आपल्या डोळ्यांवर त्याचा ताण पडतो. सारखे कंम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करणाऱ्यांच्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स आल्याचे आपण पाहतो. 

डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणं ही मोठी समस्या आहे. ही का तयार होतात हे समजून न घेता त्यावर फक्त अनेक औषध,क्रिम, महागड्या ट्रिटमेंट्स असे   उपाय केले जातात. पण यामुळे डार्क सर्कलची समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच तीव्र होते. डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होण्यास एखादं विशिष्ट कारणच कारणीभूत असतं असं नाही तर अनेक कारणं डार्क सर्कलची समस्या निर्माण करतात. आपले डोळे सुंदर आणि तजेलदार असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, बदलेल्या जीवनशैलीमुळे कमी झोप आणि ताणतणावामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्याचे प्रमाणात वाढले आहे. आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. यामुळे आपण आजारी असल्या सारखे दिसतो. डार्क सर्कलची ही समस्या दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी एक सोपा झटपट उपाय करु शकतो(Amazing Eye Masks to Get Rid of Dark Circles and Tired Eyes).

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत ?

एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून कच्चे दूध घ्यावे त्यात १ टेबलस्पून आंबे हळद घालावी. या मिश्रणात प्रत्येकी १ टेबलस्पून मध व कॉफी पावडर मिसळून घ्यावी. आता हा डार्क सर्कल आय मास्क लावण्यासाठी तयार आहे. हा डार्क सर्कल आय मास्क बोटांनी आपल्या डोळ्यांभोवती लावून घ्यावा. हा मास्क डोळ्यांभोवती लावून झाल्यावर हलक्या हातांनी डोळ्यांभोवती मसाज करुन घ्यावा. १० ते १५ मिनिटे हा मास्क डोळ्यांभोवती तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुवून घ्यावा. हा उपाय आठवडाभर रोज केल्यास, एका आठवडत्यात तुमच्या डोळ्यांभोवती असणारे डार्क सर्कल्स घालवण्यास मदत होईल.

समर स्पेशल तांदूळ व मसूर डाळीचा डि - टॅन फेसमास्क, टॅनिंग होईल चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...

 

रिबॉन्डिंग केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी? ६ सोप्या टिप्स, हेयर रिबॉन्डिंग केसांवर टिकून राहील...

इतर महत्वाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवा :- 

१. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही डोळ्यांच्या डार्क सर्कल येऊ शकतात म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. 

२. झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे डार्क सर्कल येतात. साधारणत: ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते.

३. अनेक कॉस्मेटिक्स असे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात. तसेच डोळ्यांना केलेला मेकअप चुकीच्या पध्दतीनं पुसणं हे डार्क सर्कल होण्यास कारणीभूत ठरतं.

४. लॅपटॉप, कंम्प्युटर, मोबाईल यांसारख्या गॅजेट्सचा वापर कमी प्रमाणात करा.

Web Title: Amazing Eye Masks to Get Rid of Dark Circles and Tired Eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.