आपल्या रोजच्या धावपळीत आपण एवढे अडकलेले असतो की त्वचेची काळजी घेण्यासाठी, तिच्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतच नाही. त्यामुळे मग त्वचा खूपच रापलेली, काळवंडलेली दिसू लागते. त्वचेचा पोत खराब झाला की मग आपण चेहऱ्याला वेेगवेगळे फेसपॅक किंवा फेसमास्क लावतो. त्याने त्वचेवर तेवढ्यापुरता परिणाम दिसून येतो (best remedies for reducing pigmentation and dark spots). पण पुन्हा काही दिवस गेले की त्वचा पुन्हा आधीसारखी होऊन जाते (how to get glowing skin?). म्हणूनच असे वरवरचे उपाय करण्यापेक्षा मुळातुनच तुमची त्वचा चमकदार करायची असेल तर त्यासाठी काय करावे ते पाहा...(amazing home remedies for radiant glow)
त्वचेवर चमक येण्यासाठी घरगुती उपाय
त्वचेवर चमक येण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती faceyogabysavitusingh या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. हा एक फेसयोगाचा भाग आहे. हा उपाय कसा करावा, त्याच्या ५ स्टेप्स कोणत्या ते पाहा..
महिलेची कमाल! एका वर्षात केले ३ लग्न आणि कमावले ३६ लाख, फ्लॅश मॅरेज करून तरुणांना फसवले
१. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या हाताची तर्जनी आणि मधले बोट वापरून चेहऱ्याची आणि खासकरून गालाजवळची त्वचा वरच्याबाजुने ढकलण्याचा प्रयत्न करा. हे साधारण १ मिनिट करा.
२. त्यानंतर पुढील १ मिनिटासाठी त्वचेवर हलक्या हाताने टॅपिंग करा. तुमच्या त्वचेवर ज्या भागात जास्त पिगमेंटेशन किंवा पिंपल्स येत असतील, तिथे जरा जास्त वेळ टॅपिंग करा.
३. यानंतर दोन्ही हाताच्या बोटांनी कपाळाच्या मधल्या भागावर टॅपिंग करा आणि त्यानंतर तिथली त्वचा थोडी स्ट्रेच करा. आपल्या शरीराला जशी व्यायामाची गरज असते, तशीच व्यायामाची गरज आपल्या त्वचेलाही असते.
मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन पाहिली? जेवणाची रंगत वाढविणारी सोपी रेसिपी- ५ मिनिटांत चटणी तयार...
४. यानंतर एका हाताने भुवई वर ओढून घ्या आणि दुसऱ्या हाताने डाेळ्यांच्या आजुबाजुच्या त्वचेवर टॅपिंग करा. यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे बऱ्याच प्रमाणात कमी हाेण्यास मदत होईल.
५. सगळ्यात शेवटी सिंहमुद्रा करा. सिंहमुद्रा केल्यामुळे त्वचा व्यवस्थित ताणली जाते त्यामुळे त्वचेचा चांगला व्यायाम होऊन रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे त्वचेवर छान चमक येते.