ब्रेड- जॅम, ब्रेड- सॉस, सॅण्डविज, चीज ब्रेड, ब्रेड पकोडा असे ब्रेडचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे लहान मुलांच्या अगदी आवडीचे. त्यामुळे या पदार्थांच्या निमित्ताने ब्रेड आपल्या घरात नेहमीच येत असतो. आता पुन्हा ब्रेड आणाल तेव्हा त्यातला एक ब्रेड बाजूला काढा आणि त्याचा तुमच्या त्वचेसाठी असा मस्त उपयोग करून बघा. स्वयंपाक घरातील वेगवेगळे पदार्थ जसे सौंदर्य खुलविण्यासाठी (Amazing uses of bread for glowing skin) उपयोगी ठरतात, तसाच फायदा ब्रेडचाही होतो. त्वचेसाठी ब्रेडचा २ पद्धतींनी वापर करता येतो (How to Use Bread For Skin).
त्वचेसाठी ब्रेडचा वापर
१. ब्रेडचा फेसपॅक
त्वचेवर ग्लो आणण्यासाठी या फेसपॅकचा उपयोग होतो. त्यासाठी एका वाटीत ३ ते ४ चमचे कच्चं दूध घ्या. त्यात ब्रेड बुडवून ठेवा.
गुळाचा चहा नेहमीचाच... आता गुळाचं पाणी पिऊन बघा, इम्युनिटी वाढविण्यासह ५ जबरदस्त फायदे
ब्रेड भिजून त्याची पेस्ट झाली की ती हाताने एकासारखी कालवून घ्या आणि तो फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर हाताने चोळून चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्वचेवरचं टॅनिंग कमी होऊन त्वचा चमकदार दिसेल.
२. ब्रेड स्क्रब
यासाठी ब्रेड, कॉफी पावडर, दूध आणि लिंबू यांचा वापर करावा. यासाठी २ ते ३ चमचे दूध, १ टीस्पून कॉफी पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस असं मिश्रण एका वाटीत एकत्र करा.
पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा
त्यात ब्रेड भिजवून पेस्ट तयार करा. चेहरा ओलसर करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. डेड स्किन निघून जाईल.