Lokmat Sakhi >Beauty > ऐन सणासमारंभात केस पांढरे दिसतात? चमचाभर तुपात हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर होतील केस

ऐन सणासमारंभात केस पांढरे दिसतात? चमचाभर तुपात हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर होतील केस

Amla Bhringraj Brahmi And Curry Leaves : खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नसल्यामुळे हॉर्मोनल इंम्बॅलेन्स आणि ताण-तणाव उद्भवतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:30 PM2024-09-06T15:30:13+5:302024-09-06T15:46:30+5:30

Amla Bhringraj Brahmi And Curry Leaves : खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नसल्यामुळे हॉर्मोनल इंम्बॅलेन्स आणि ताण-तणाव उद्भवतो.

Amla Bhringraj Brahmi And Curry Leaves Mix With Ghee For Grey Hairs | ऐन सणासमारंभात केस पांढरे दिसतात? चमचाभर तुपात हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर होतील केस

ऐन सणासमारंभात केस पांढरे दिसतात? चमचाभर तुपात हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर होतील केस

केस पांढरे होणं खूपच सामान्य आहे. (Grey Hairs Solution)  लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचे केस पांढरे होतात ऐन सणासुधीला केस पांढरे दिसत असतील तर खूपच लाजिरवाणे  वाटते. पांढरे केस काळे करण्यासाठी लोक अनेक कॉस्मॅटीक प्रोडक्ट्सचा वापर करतात. यासाठी सगळ्यात आधी आहारात बदल करणं फार महत्वाचे आहे.  (Hair Care Tips) शरीरातील पोषक तत्वांच्या   कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात.

व्यतिरिक्त खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नसल्यामुळे हॉर्मोनल इंम्बॅलेन्स आणि ताण-तणाव उद्भवतो. शरीरात मिनरल्स आणि व्हिटामीन्स, प्रोटीन्सची कमतरता भासल्यास केस गळती सुरू होते. काही खास पदार्थांचा आपल्या आहारात  समावेश केल्यास केस गळतीपासून सुटका मिळवता येते.  ज्यामुळे केस गळणं कमी होऊ शकतं. (Amla Bhringraj Brahmi And Curry Leaves) 

पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

एक्सपर्ट्स सांगतात की पांढरे केस कमी करण्यासाठी तुम्ही तुपात ब्राम्ही, कढीपत्ते, भृंगराज आणि आवळा मिसळू शकता.  रात्री झोपताना किंवा सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. एक चमचा तुपात मिसळून खा. आवळ्यात एंटीफंगल, एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस पांढरे होणं रोखता येतं. 

भृंगराजमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन डी, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम आणि एंटी बॅक्टेरिअल  गुण असतात. ज्यामुळे वेळेआधी केस पांढरे होणं टाळता येतं. ब्राम्ही केसांसाठी फायदेशीर ठरते.यात एंटीऑक्सिडेंट्स मिनरल्स आणि व्हिटामीन्स असातत. ब्राम्हीमुळे स्काल्पला आराम मिळतो आणि ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. ताण-तणावामुळे केस खूप गळतात.

केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. यात प्रोटीन्स, बीटा कॅरोटीन, व्हिटामीन बी-६ असते. ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते आणि केस वेळेआधी पांढरे होत नाही. या मिश्रणाने स्ट्रेस, इन्फ्लेमेशन कमी होते आणि हेअर ग्रोथ वाढते. केसांना वेळेआधीच पांढरे होण्यापासून रोखणं शक्य होतं. 

Web Title: Amla Bhringraj Brahmi And Curry Leaves Mix With Ghee For Grey Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.