Lokmat Sakhi >Beauty > आवळा म्हणजे अमृत सौंदर्यसाठीही; आवळ्याच्या फेसपॅकचे 5 फायदे.. मिळवा देखणे रूप!

आवळा म्हणजे अमृत सौंदर्यसाठीही; आवळ्याच्या फेसपॅकचे 5 फायदे.. मिळवा देखणे रूप!

आवळा पावडरच्या लेपानं मुरुम पुटकुळ्या, सुरकुत्या आणि डाग या त्वचेच्या चिवट समस्यांवर सहज उपाय करता येतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 04:22 PM2022-03-10T16:22:18+5:302022-03-10T16:29:56+5:30

आवळा पावडरच्या लेपानं मुरुम पुटकुळ्या, सुरकुत्या आणि डाग या त्वचेच्या चिवट समस्यांवर सहज उपाय करता येतो.

Amla is beneficial for beauty also; 5 Benefits of Amla Facepack .. Get a good look with amla | आवळा म्हणजे अमृत सौंदर्यसाठीही; आवळ्याच्या फेसपॅकचे 5 फायदे.. मिळवा देखणे रूप!

आवळा म्हणजे अमृत सौंदर्यसाठीही; आवळ्याच्या फेसपॅकचे 5 फायदे.. मिळवा देखणे रूप!

Highlightsआवळ्यातील अ आणि क जीवनसत्व निरोगी त्वचेसाठी महत्त्वाची असतात. आवळ्यातील ॲण्टिऑक्सिडण्टसचा त्वचेस फायदा होतो.आवळ्याच्या लेपामुळे त्वचेतील पीएच स्तर सुधारतो, संतुलित राहातो.

निरोगी आरोग्यासाठी आवळा खाणं महत्त्वाचं मानलं जातं. आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही आवळा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. त्वचा सुंदर आणि निर्दोष करण्यासाठी आवळ्याचा उपयोग त्वचेसाठी केला जातो. यासाठी आवळा खाण्यासोबतच चेहेऱ्याला लावणं आवश्यक आहे. आवळा पावडरच्या लेपाद्वारे  मुरुम पुटकुळ्या, सुरकुत्या आणि डाग या त्वचेच्या चिवट समस्यांवर सहज उपाय करता येतो. 

Image: Google

कसा करायचा आवळ्याचा फेसपॅक? 

आवळ्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी आवळा पावडरची गरज असतक‌ायुर्वेदिक दुकानांमध्ये शुध्द स्वरुपातील आवळा पावडर विकत मिळते.  आवळा पावडर, दही आणि मध यांचा एकत्रित उपयोग करुन आवळ्याचा लेप तयार करता येतो. आवळ्याचा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत आवळा पावडर घ्यावी. त्यात दही, मध घालून सर्व एकजीव करावं. हा लेप चेहेरा आणि मानेस लावावा. 15-20 मिनिटं लेप चेहेऱ्यावर सुकू द्यावा. उत्तम परिणामांसाठी हा लेप आठवड्यातून एकदा लावण्याचा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देतात.

 Image: Google 

आवळ्याच्या लेपाचे फायदे

आवळ्यामध्ये अ, क ही जीवनसत्वं भरपूर प्रमाणात असतात. निरोगी त्वचेसाठी दोन्ही जीवनसत्वं महत्त्वाची असतात. आवळ्याचा उपयोग त्वचेसाठी केल्यास त्वचेशी निगडित अनेक समस्या दूर होतात. 
1. आवळ्याचा लेप चेहेऱ्यास लावल्याने त्वचा स्वच्छ होते. त्वचेवर असलेले हानिकारक जिवाणू नष्ट होतात. त्वचा उजळ होण्यास या लेपाने मदत होते. 

2. आवळ्यामध्ये पोषक गुणधर्म असतात. आवळ्याचा लेप लावल्यानं चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येत नाही. तसेच या लेपातील दह्यामुळे चेहेऱ्यावरील मुरुम नाहिसे होतात. 

Image: Google

3. आवळ्याच्या लेपामुळे त्वचा मऊ आणि उजळ होते. या लेपातील मधामुळे त्वचेला आर्द्रता मिळते. त्वचा ओलसर होण्यास मदत होते. या लेपामुळे त्वचेचा पीएच स्तर संतुलित राहातो. कोरड्या त्वचेची समस्या आवळ्याच्या लेपामुळे सुटते. 

4. आवळ्यातील ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. त्याचा त्वचेला फायदा होतो. आवळ्याच्या लेपानं त्वचेत ओलसरपणा तयार होतो. त्वचेचं संसर्गापासून संरक्षण होतं. आवळ्याच्या लेपामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. 

Image: Google

5. त्वचेवरील सुरकुत्या कमी होवून त्वचा तरुण दिसण्यास आवळ्याचा लेप मदत करतो. आवळ्याचा लेप चेहेऱ्याला लावल्याने सुरकुत्या, चेहेऱ्यावरील रेषा दूर होतात. 
 

Web Title: Amla is beneficial for beauty also; 5 Benefits of Amla Facepack .. Get a good look with amla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.