बऱ्याचदा आपण पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी किंवा फॅशन म्हणून केसांना रंगविण्यासाठी वेगवेगळ्या हेअर डायचा वापर करतो. खरंतर, वाढत्या वयाशिवाय सध्याच्या काळात बदललेली लाईफस्टाईल आणि हेअर केअरच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील वेळेआधीच आपले केस पांढरे होतात. अशाच काही कारणांमुळे लोक आपले पांढरे केस लपविण्यासाठी आणि चांगल्या हेअरस्टाईलसाठी केसांना कलर करतात. हेअर डायमध्ये आणि हेअर कलर्समध्ये हानिकारक रसायने असतात जे तुमचे केस खराब होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
हेअर डायमध्ये आणि हेअर कलर्स वापर केल्याने केस सुंदर आणि आकर्षक दिसू लागतात. मात्र, त्यांचा वारंवार वापर केल्याने केसांचे नुकसान होते. अमोनिया फ्री हेअर डाय व हेअर कलर वापरल्याने केसांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. असा आपला समज असेल तर, अमोनिया फ्री हेअर डाय व हेअर कलर केसांसाठी वापरणे योग्य आहे का? याविषयातील तज्ज्ञ काय सांगतात पाहूयात(Ammonia In Hair Dyes & Color's - How Unsafe Are They : Expert Talk).
हेअर डाय व हेअर कलर मधील अमोनिया आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ठरु शकतो धोकादायक...
अमोनिया फ्री हेअर डाय व हेअर कलर्सबद्दल बोलताना, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अध्ययन केलेल्या सुप्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट व हेअर एक्सपर्ट डॉक्टर किरण सांगतात, आपण वापरत असलेल्या बहुतेक सगळ्याच हेअर डाय व हेअर कलर्समध्ये अमोनिया या केमिकलयुक्त घटकाचा भरपूर प्रमाणांत वापर करण्यात येतो. हेअर डाय व हेअर कलर्सचा वारंवार वापर केल्याने अमोनिया आपल्या स्कॅल्प मार्फत केसांच्या हेअर फॉलिकल्स पर्यंत जातात. यामुळे हेअर डाय व हेअर कलर्स हे केसांच्या मुळांपर्यंत जाते. अशा परिस्थितीत, अमोनिया हा घटक केसांच्या मुळांना इजा पोहोचवून हेअर फॉलिकल्सना कमजोर बनवतो. अशा प्रकारे वारंवार हेअर डाय व हेअर कलर्सचा वापर केल्याने अमोनिया या केमिकलयुक्त घटकाचा आपल्या स्कॅल्पवर एक थर तयार होतो. ज्यामुळे हेअर फॉलिकल्स कमजोर होऊन केस गळतीची समस्या सुरु होते. कितीही मोठ्या किंवा चांगल्या ब्रँडचा हेअर डाय व हेअर कलर असला तरीही त्यात कमी अधिक प्रमाणात अमोनिया हा केमिकलयुक्त घटक मिसळलेला असतोच. त्याच्यबरोबर, जर हेअर डाय व हेअर कलरमध्ये अमोनिया नसेल पण त्या ऐवजी इतर केमिकल हे काही अंशी मिसळलेले असतातच. ज्यामुळे आपल्या केसांसंबंधीच्या समस्येत अधिक भर पडू शकते.
हेअर डाय व हेअर कलर्समध्ये असणारे केमिकल्स आपल्या केसांचा रंग कायमचा किंवा थोड्या दिवसांसाठी बदलू शकतात. परंतु हेअर डाय व हेअर कलर्सचा वापर वारंवार करणे हे केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. हेअर डाय व हेअर कलर्समध्ये असणाऱ्या अमोनियामुळे केसांचे जितके नुकसान होते तितकेच नुकसान त्यात असणाऱ्या इतर केमिकल्समुळे देखील होऊ शकते. एकूणच केसांवर हेअर डाय व हेअर कलर्सचा वापर करणे योग्य नाही. तसेच अमोनिया फ्री नावाखाली विकले जाणारे हेअर डाय व हेअर कलर्स हे देखील चांगल्या केसांचे आरोग्य बिघडवू शकते.
अमोनिया फ्री म्हणून विकले जाणारे हेअर डाय व हेअर कलर्स यांत अमोनिया नसेल हा विचार करून आपण असे हेअर डाय व हेअर कलर्स खरेदी करतो. परंतु एक्स्पर्टसच्या नुसार, अमोनिया फ्री म्हणून विकले जाणारे हेअर डाय व हेअर कलर्स ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. हेअर डाय व हेअर कलर्स यांची विक्री वाढावी, भरपूर खप व्हावा यासाठी जाहिरातीच्या उद्देशाने त्यांच्या पॅकेजिंगवर अमोनिया फ्री असे लिहिले जाते. शक्यतो केस रंगविण्यासाठी मेहेंदी सारख्या नैसर्गिक पद्धतींचा वापर करावा.
एकूणच आपण देखील केस रंगविण्यासाठी हेअर डाय व हेअर कलर्स हे अमोनिया फ्री आहेत म्हणून ते वापरण्यास योग्य आहेत, असा समज करुन घेतला असेल तर तो चुकीचा आहे. अमोनिया फ्री किंवा इतर कोणत्याही चांगल्या ब्रॅंड्सचे हेअर डाय व हेअर कलर्स वापरत असाल तर काही कालांतराने याचा आपल्या केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.