Lokmat Sakhi >Beauty > अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...

अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...

4 kitchen ingredients to use to prep your skin for Navratri celebrations : Navratri 2024 Day 1 Yellow Facemask For Glowong Skin : Ananya Panday shares her mother's secret yellow facemask recipe : नवरात्र स्पेशल : पिवळ्या रंगाचे ४ घरगुती पदार्थ वापरुन १० मिनिटांत तयार करा ग्लोइंग फेसमास्क..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 02:09 PM2024-10-03T14:09:55+5:302024-10-03T14:24:11+5:30

4 kitchen ingredients to use to prep your skin for Navratri celebrations : Navratri 2024 Day 1 Yellow Facemask For Glowong Skin : Ananya Panday shares her mother's secret yellow facemask recipe : नवरात्र स्पेशल : पिवळ्या रंगाचे ४ घरगुती पदार्थ वापरुन १० मिनिटांत तयार करा ग्लोइंग फेसमास्क..

Ananya Panday shares her mother's secret yellow facemask recipe 4 kitchen ingredients to use to prep your skin for Navratri celebrations | अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...

अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...

आपली स्किन सुंदर दिसावी आणि ग्लो कायम राहावा यासाठी अनेकजणी वेगवेगळे उपाय करतात. यासाठी काहीजणी पार्लर, स्पामध्ये जाऊन महागड्या आणि वेळखाऊ स्किन ट्रिटमेंट्स करून घेतात. असे असले तरीही पार्लर, स्पामध्ये केल्या जाणाऱ्या स्किन ट्रिटमेंट्समध्ये केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. हे केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स स्किनसाठी हानिकारक ठरु शकतात. आपल्या आजीच्या बटव्यातील नैसर्गिक-आयुर्वेदिक उपचारांपुढे हे आर्टिफिशियल उपाय फिकेच आहेत. यासाठीच आजीबाईच्या बटव्यातील हे साधेसोपे उपाय इतके लोकप्रिय आहेत की, चक्क बॉलिवूड अभिनेत्री देखील हा खास पिवळा फेसमास्क वापरणे पसंत करते(4 kitchen ingredients to use to prep your skin for Navratri celebrations).
       

स्किन ग्लो आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आयुर्वेदातील सर्वात उत्तम उपाय म्हणजे आंबेहळद, बेसन. हेल्दी, सुंदर स्किनसाठी आंबेहळद, बेसन अतिशय उपयोगी आहे. या नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन देखील आपण स्किन घरच्याघरीच चमकदार आणि ग्लोइंग करु शकता. स्किन ग्लो कायम टिकून राहावा आणि अनेक स्किन प्रॉब्लेम्स दूर व्हावेत म्हणून हा खास पिवळ्या रंगाचा घरगुती फेसमास्क (Navratri 2024 Day 1 : Yellow Facemask For Glowong Skin) नक्की ट्राय करुन पाहा. दररोज नियमितपणे हा उपाय केला तर काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल. एवढंच नाही तर त्वचेला इतरही अनेक मिळतील. हे फायदे नेमके कोणते आणि हा फेसमास्क कसा करायचा, याविषयीची ही खास माहिती(Ananya Panday shares her mother's secret yellow facemask recipe).

साहित्य :- 

१. बेसन - १ टेबलस्पून 
२. आंबेहळद - १ टेबलस्पून 
३. दही - १ टेबलस्पून 
४. मध - १ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ? 

एका बाऊलमध्ये प्रत्येकी एक टेबलस्पून बेसन, आंबेहळद, दही, मध हे सगळे जिन्नस घेऊन ते व्यवस्थित चमच्याच्या मदतीने हलवून एकजीव करुन घ्यावे. आपला फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे. 

कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...


गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला पिवळ्या रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.  

लग्न ठरलंय-चेहऱ्यावर हवा सिलेब्रिटींसारखा ग्लो? वापरा 'हा' खास फेसमास्क, ब्रायडल ग्लो येईल...

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. बेसन :- बेसन त्वचेवरील टॅन आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे स्किनवरील ग्लो नाहीसा झाला असेल तर त्यासाठीही बेसनचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं. 

२. आंबेहळद :- आंबेहळद त्वचेवरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुम, पुरळ इत्यादी समस्या दूर करण्यास मदत करते. याचबरोबर त्वचेचा रंग नॅचरल पद्धतीने उजळण्यास फायदेशीर असते. 

३. दही :- दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेवरील मृत पेशी काढून नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. तसेच यातील फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजे या घटकांमुळे त्वचा निरोगी राहते. 

४. मध :- मध हे नैसर्गिक ब्लीच आणि एक्सफोलिएटर म्हणून काम करते. मधात नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात, जे त्वचेचे टॅनिंग कमी करून नैसर्गिक रंग उजळ करण्यास मदत करतात.

Web Title: Ananya Panday shares her mother's secret yellow facemask recipe 4 kitchen ingredients to use to prep your skin for Navratri celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.