प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या चित्रपटांसह फिटनेस आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनन्याच्या त्वचेवर कधीच मेकअपचे थर दिसत नाही. नेहमीच सिंपल, क्लासी तितक्याच आकर्षक लूकमुळे ती सगळ्यांचच लक्ष वेधून घेत असते. तुमचा विश्वास बसणार नाही पण अनन्या महागड्या उत्पादनांसोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायांनाही तितकंच महत्व देते.
चित्रपट स्टूडंट ऑफ द ईअर -२ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या सुंदरतेमुळे खूप चर्चेत असते. ग्लोईंग त्वचेसाठी अन्यना हळद, दही आणि मधाचा फेसपॅक लावते. याव्यतिरिक्त त्वचेचे मॉईश्चर टिकून राहण्यासाठी ही गुलाब पाण्याचा वापर करते.
सुर्याच्या किरणांपासून त्वचेला हानी पोहोचू नये यासाठी ती गुलाब पाण्याचा स्प्रे आपल्या चेहऱ्यावर मारते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी अन्यना गरम पाणी पिते. नंतर अनन्या फेस वॉश करून त्वचेर मॉईश्चरायजर लावते. जेणेकरून तिची त्वचा नेहमी ग्लोईंग राहील.
अनन्या पांडेसारख्या मेकअपसाठी या टिप्स फॉलो करा
मेकअप करण्यापूर्वी, आपली त्वचा हायड्रेटिंग क्रीमने ओलसर करा पुढे, आपल्या ब्रशचा वापर करून संपूर्ण चेहऱ्यावर स्मॅशबॉक्स हॅलो हेल्दी ग्लो टिंटेड मॉइश्चरायझर ब्रॉड स्पेक्ट्रम एसपीएफ़ 25 कव्हरेजसह टिंटेड मॉइश्चरायझर लावा. डोळ्यांच्या खाली त्वचेवर कुठेही डाग असल्यास क्रिमी कंन्सिलर लावा. चेहऱ्यावरचे नको असलेले केस विचित्र दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील केसविरहीत ग्लोईंग स्किन
त्यानंतर शिमरी क्रीम आयशॅडो तयार करण्यासाठी बोटांच्या टोकाचा वापर करा. त्यानंतर आयलायनर पेन्सिलच्या मदतीनं डोळ्यांवर आयलायनर लावा. छोट्या स्मजिंग ब्रशसह, डार्क रेषेला हलके अस्पष्ट करा. त्यानंतर तुम्हाला आवडत असलेल्या रंगाचा मस्करा लावा. नंतर ब्रशनं पावडर लावून मेकअप सेट होऊ द्या. जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा
आयब्रो पेन्सिलचा वापर करून भुवायांना हवा तसा शेप द्या. आपल्या ओठांना सौम्य लिप स्क्रबसह सौम्य एक्सफोलिएशन द्या आणि जेव्हा ओठ गुळगुळीत होतील तेव्हा क्रिम बेस्ड गुलाबी लिपस्टिक लावा. केसांवर काहीही करण्याआधी हिट प्रोटेक्शन स्प्रे वापरा. नंतर तुम्ही करली किंवा स्ट्रेट हेअर, बन स्टाईल करू शकता.