Lokmat Sakhi >Beauty > वयाच्या ६४ व्या वर्षीही तरूण दिसण्याचं सिक्रेट; स्प्रिंट रेसमधील फिटनेसमुळे अनिल कपूर चर्चेत

वयाच्या ६४ व्या वर्षीही तरूण दिसण्याचं सिक्रेट; स्प्रिंट रेसमधील फिटनेसमुळे अनिल कपूर चर्चेत

Anil Kapoor Fitness : अनिल अनेकदा त्यांच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. अलीकडेच त्याने आपल्या एका मजेदार उपक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 01:42 PM2021-07-25T13:42:03+5:302021-07-25T14:10:58+5:30

Anil Kapoor Fitness : अनिल अनेकदा त्यांच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. अलीकडेच त्याने आपल्या एका मजेदार उपक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Anil Kapoor Fitness : Bollywood actor anil kapoor shares sprinting video for olympics know its health benefits | वयाच्या ६४ व्या वर्षीही तरूण दिसण्याचं सिक्रेट; स्प्रिंट रेसमधील फिटनेसमुळे अनिल कपूर चर्चेत

वयाच्या ६४ व्या वर्षीही तरूण दिसण्याचं सिक्रेट; स्प्रिंट रेसमधील फिटनेसमुळे अनिल कपूर चर्चेत

Highlightsवजन कमी करण्यासाठी स्प्रिंट रेस हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. जर आपण वेगाने आपले वजन कमी करण्याचा विचार करीत असाल तर आपण आपल्या दिनचर्यामध्ये या व्यायामाचा समावेश करू शकता.आपण घरच्या घरीही स्प्रिंटींग करू शकता. तसंच पैशाचीही बचत होते. आपण आपल्या घराच्या छतावर, बागेत किंवा रस्त्याच्या कडेलाही हा व्यायाम प्रकार करू शकता.

अनिल कपूर आपल्या फिटनेसमुळे (Anil Kapoor Fitness Secret) नेहमीच चर्चेत असतो. ६४ वर्ष वयातही अनिल कपूर  सिनेमांच्या तुलनेत आपल्या फिटनेसमुळे अधिक चर्चेत आहे.  त्याच्या टोन्ड बॉडीकडे पहता असे म्हणू शकते की वाढतं वय थांबत आहे. त्यांना कायमचे तरूण म्हणणं चुकीचे ठरणार नाही. अनिल अनेकदा त्यांच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.

अलीकडेच त्याने आपल्या एका मजेदार उपक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जपानची राजधानी टोकियो येथे सुरू झालेल्या ऑलिम्पिकबद्दल जग उत्साहात असताना त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अनिल स्प्रिंट रेस करत आहे आणि लोकांना खेळाकडे आकर्षित करत आहे. अनिलच्या फिटनेसचे रहस्य त्यांचे सक्रीय असणं आणि धावण्याची सवय हे असल्याचं या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. 

स्प्रिंटींग काय आहे?

वजन कमी करण्यासाठी स्प्रिंट रेस हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. जर आपण वेगाने आपले वजन कमी करण्याचा विचार करीत असाल तर आपण आपल्या दिनचर्यामध्ये या व्यायामाचा समावेश करू शकता. स्प्रिंट वर्कआउटमुळे कॅलरी बर्‍याच वेगाने कमी होतात. पण सगळ्यांनाच हा व्यायाम सोपा वाटत नाही. 

मर्यादित प्रमाणात शरीराच्या सर्वोच्च वेगाने धावणे म्हणजे स्प्रिंट रेस असे म्हणतात. सहसा अशी शर्यत आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये आयोजित केली जाते आणि ती तुम्हाला टोकियो ऑलिम्पिकमध्येही पाहायला मिळेल. त्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत जे खाली नमूद केले जात आहेत.

शरीराच्या संरचनेत सुधारणा

आपण स्प्रिंट रेसमधून आपल्या शरीराची रचना सुधारू शकता. संशोधनात असे दिसून आले आहे की स्प्रिंट रेसमध्ये धावल्यानं जास्त चरबी वाढत नाही तर स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहित मिळते. स्प्रिंट रेस आपल्या शरीरातील पेशींना तयार करण्यास आणि उर्जा देण्यात फायदेशीर ठरते. वेग आणि पॉवर वाढवायची असेल तर त्यांच्यासाठी स्पिंटिंग एक उत्तम व्यायाम आहे. दररोज स्प्रिंटिंग केल्याने हाडं मजबूत होतात आणि स्नायू सुधारतात.  नियमितपणे स्पिंटिंग केल्यानं तुम्ही आपण  लवकर वयस्कर दिसणार नाही.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

फिटनेस इंडस्ट्रीमध्ये हिल्ट ट्रेनिंग (high-intensity interval training) सध्या ट्रेडिंग आहे. अनेक जीम्समध्ये याचे प्रशिक्षण दिले जाते. स्प्रिंट रेस हिल्ट ट्रेनिंगचं एक सर्वोत्तम टूल आहे. जर्नल ऑफ स्पोर्ट्स साइंस मेडिसिनच्या शोधानुसार कार्डियोवॅस्कुलर फिटनेससह HIIT ट्रेनिंगचे अनेक फायदे आहेत. 

ताण कमी होतो

व्यायामाच्या इतर प्रकारांप्रमाणेच स्प्रिंट प्रशिक्षणाद्वारे ताण कमी केला जाऊ शकतो. हे मेंदूमध्ये एंडोर्फिन हॉर्मोन रिलीझ करते आणि प्रशिक्षणादरम्यानचा तणाव कमी करते. असे केल्यावर तुम्हाला थकव्याऐवजी बरे वाटेल. धावणे तुमच्या शरीर आणि मनाला शांती देते. याशिवाय पचनाच्या समस्याही दूर होतात.

स्पिंटिंग बद्दल मोठी गोष्ट म्हणजे ती कोठेही केली जाऊ शकते. आपल्याला विशेष उपकरणे किंवा कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. आपण घरच्या घरीही स्प्रिंटींग करू शकता. तसंच पैशाचीही बचत होते. आपण आपल्या घराच्या छतावर, बागेत किंवा रस्त्याच्या कडेलाही हा व्यायाम प्रकार करू शकता.

Web Title: Anil Kapoor Fitness : Bollywood actor anil kapoor shares sprinting video for olympics know its health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.