Join us  

डोळ्यांखाली बारीक लाईन्स आल्या? किचनमधल्या ३ वस्तूंचा फेसपॅक लावा; कायम तरूण दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 8:53 AM

Anti Ageing Face Pack : काही एंटी एजिंग फेस पॅक तुमचं काम सोपं करू शकतात.

त्वचेवर सुरकुत्या फाईन लाईन्स येणं ही वाढत्या वयाची लक्षणं आहेत. (Beauty Hacks) अनेकदा त्वचा वयाच्या आधीच म्हातारी दिसू लागते. केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वारंवार वापर केल्यामुळे त्वचेवर चुकीचा परिणाम होतो. (Skin Care Tips) अशात  जर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर चेहरा जराही चांगला दिसत नाही. (Anti Ageing  Face Pack) काही एंटी एजिंग फेस पॅक तुमचं काम सोपं करू शकतात. ज्यामुळे त्वचा नैसर्गिक रित्या चांगली राहण्यास मदत होईल. घरच्या तयार केलेले एंटी एजिंग फेसपॅक लावून तुम्ही वाढत्या वयात विशीतला लूक मिळवू शकता. (Anti-Aging Tips)

सफरचंदाचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक सफरचंद घ्या, त्याचे लहान तुकडे करा, पाण्यात टाका आणि उकळा. सफरचंद मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता एका भांड्यात सफरचंद काढा आणि चमच्याने मॅश करा. त्यात एक चमचा मध आणि दुधाची पावडर मिसळून पेस्ट बनवा. ऍपल फेस पॅक तयार आहे. हा पॅक 20 ते 25 मिनिटे चेहरा आणि मानेवर लावा आणि नंतर धुवा.

दह्याचा फेस पॅक

दही उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. फेसपॅकचा परिणाम सुरकुत्या कमी करण्यातही चांगला होतो. फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे दही, एक चमचा मध, एक चमचा ताजे लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद मिक्स करा. सर्व साहित्य एकत्र करून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे ठेवा. आता चेहरा धुवून स्वच्छ करा.

बटाट्याचा रस

बटाटा भाजीला वापरला जातो. त्याचप्रमाणे स्वयंपाकातही बटाटा वापरला जातो.  बटाट्याचा रस त्वचेचे कोलेजन वाढवण्यास मदत करतो आणि त्वचेचा मजबूतपणा टिकवून ठेवतो. हा उपाय करण्यासाठी एक बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस पिळून घ्या. त्यात कापूस बुडवून संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा. या उपायाने त्वचा चमकण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी