Lokmat Sakhi >Beauty > किचनमधल्या ४ पदार्थांमध्ये दडलेत ॲण्टी एजिंग गुण; रोज खा,तिशीनंतरही कायम दिसाल तरुण आणि फ्रेश

किचनमधल्या ४ पदार्थांमध्ये दडलेत ॲण्टी एजिंग गुण; रोज खा,तिशीनंतरही कायम दिसाल तरुण आणि फ्रेश

Anti Ageing Tips : पन्नाशीनंतर शारीरिक ताकद, स्मरणशक्ती आणि त्वचेचा पोत यांवर परिणाम होतो. घरातले काही पदार्थ तुम्हाला फिट, निरोगी  राहण्यास मदत करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:09 PM2023-03-16T12:09:48+5:302023-03-17T13:35:09+5:30

Anti Ageing Tips : पन्नाशीनंतर शारीरिक ताकद, स्मरणशक्ती आणि त्वचेचा पोत यांवर परिणाम होतो. घरातले काही पदार्थ तुम्हाला फिट, निरोगी  राहण्यास मदत करू शकतात.

Anti Ageing Tips : 4 nutrients with anti aging properties for men and women | किचनमधल्या ४ पदार्थांमध्ये दडलेत ॲण्टी एजिंग गुण; रोज खा,तिशीनंतरही कायम दिसाल तरुण आणि फ्रेश

किचनमधल्या ४ पदार्थांमध्ये दडलेत ॲण्टी एजिंग गुण; रोज खा,तिशीनंतरही कायम दिसाल तरुण आणि फ्रेश

म्हतारपण आयुष्यातील शेवटचा काळ असल्यानं या काळात कमकुवतपणा, विसरण्याचे आजार, सुरकुत्या, लूज त्वचा अशा समस्यांचा सामना करावा लागतो. रोजच्या खाण्यातल्या  पदार्थात अनेक एंटी एजिंग गुणधर्म  असतात जे पन्नाशीनंतरही लठ्ठपणा येऊ देत नाहीत. पन्नाशीनंतर शारीरिक ताकद, स्मरणशक्ती आणि त्वचेचा पोत यांवर परिणाम होतो. घरातले काही पदार्थ तुम्हाला फिट, निरोगी  राहण्यास मदत करू शकतात. (4 nutrients with anti aging properties for men and women)

केसर

केसरमध्ये क्रोसिन नावाचा एक पिवळा कॅरोटेनाॉईड पिग्मेंट आढळतो. एसीबीआयच्या रिपोर्टनुसार यामुळे वाढत्या वयात उद्भवणारे त्रास वाचतात. याशिवय एंटी कॅन्सर, एंटी इंफ्लामेटरी, एंटी एंग्जायटी, एंटी डायबिटीक गुणधर्म असतात.

हळद

हळदीचा वापर प्रत्येक घरात केला जातो.  कर्क्यूमिन हे या मसाल्यातील मुख्य संयुग आहे, जे वृद्धत्वाशी संबंधित समस्यांना प्रतिबंधित करते. संशोधनानुसार कर्क्यूमिन अनेक घातक रोगांचा विकास रोखू शकतो.

कोलोजन

कोलेजन हे एक प्रोटीन आहे ज्याचे उत्पादन वाढत्या वयाबरोबर कमी होते. यामुळे, त्वचा लवचिकता गमावू लागते आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण सार्डिन मासे, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्रोकोली, कोरफडचा रस इत्यादींमध्ये त्याचे उत्पादन वाढवणारे गुणधर्म असतात.

ओघळलेल्या स्तनांना परफेक्ट शेप येण्यासाठी घरीच करा २ व्यायाम; सुडौल, आकर्षक दिसाल

व्हिटामीन सी

एक व्हिटामीन सी अँटिऑक्सिडेंट आहे. जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करते. ऑक्सिडेटिव्ह ताण हा हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो आणि जळजळ, विस्मरण, खराब दृष्टी होणं यासारख्या समस्या निर्माण करते. हे टाळण्यासाठी पेरू, किवी, ब्रोकोली, लिंबू, संत्री इत्यादींमधून व्हिटॅमिन सी घेता येते.

Web Title: Anti Ageing Tips : 4 nutrients with anti aging properties for men and women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.