Join us  

Anti Ageing Tips : रोजच्या चुकांमुळे कमी वयातच वयस्कर दिसतो चेहरा; सुरकुत्या टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:07 PM

Anti Ageing Tips : शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. कारण व्यायाम न करणे किंवा दैनंदिन जीवनशैलीत शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

प्रत्येकाला कायम तरुण राहायचे असते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही वाईट सवय असते. (Anti ageing Tips)  ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. या सवयी केवळ आपल्या आरोग्यासाठीच हानिकारक नसतात तर वृद्धत्वाच्या प्रक्रियेला गती देतात. अशा स्थितीत तुम्ही तरुण वयात म्हातारे दिसू लागतात. (Premature early aging common causes tension sleep disorder physical inactivity diet smoking drinking)

या सवयींमुळे कमी वयातच म्हातारे दिसू शकता

१) ताण-तणाव

कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त विचार केल्याने त्वचेवर वृद्धवाच्या खुणा दिसू शकतात. ते लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक किंवा शारीरिक आजाराला बळी पडू शकतात. टेन्शन हा एक अतिशय घातक आणि सायलेंट किलर आहे. त्यामुळे दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर जास्त ताण घेणे टाळा.

२) झोप पूर्ण न होणं

दररोज 7 ते 8 तास झोप न मिळणे ही देखील एक मोठी समस्या आहे, ज्याचा तणावाशी खोलवर संबंध आहे. झोप आपल्याला तरुण राहण्यास आणि तणावमुक्त राहण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. पण काही लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे, ज्याचे दुष्परिणाम भविष्यात दिसू शकतात.

उन्हामुळे डोळ्यांची जळजळ, चेहरा, केसही खराब झालेत? डॉक्टरांनी सांगितले तब्येत सांभाळण्याचे उपाय

३) फिजिकल एक्टिव्हीटी

शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. कारण व्यायाम न करणे किंवा दैनंदिन जीवनशैलीत शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत शरीराला रोग लवकर घेरतात आणि ते झपाट्याने शरीर वृद्धापकाळाकडे वळते.

४) योग्य आहार न घेणं

खराब आहार देखील जलद वृद्धत्वासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. डॉ. अबरार म्हणतात की 21 व्या शतकात सोडा, प्रक्रिया केलेले अन्न आणि फॅटी फूड यासारख्या गोष्टी आपल्या आहाराचा एक मोठा भाग बनल्या आहेत आणि आपल्या आयुर्मानात घट होण्यास सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यामुळे वाईट आहार घेणे टाळा आणि काहीतरी आरोग्यदायी खा.

 ओरल सेक्स केल्याने घशाचा कॅन्सर होतो? ७ गोष्टी, लैंगिक आजारांचाही धोका टाळा

५) धुम्रपान, मद्यपान

तणाव किंवा चिंता टाळण्यासाठी, बरेच लोक दारू, तंबाखू किंवा मादक पदार्थांचे सेवन करू लागले आहेत. यामुळे तरुण पिढी अधिक आकर्षित होत आहे. याच्या अतिसेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो त्याचे सतत आणि जास्त सेवन आपल्याला वृद्धत्वाकडे वेगाने ढकलते आहे. हे मेंदू आणि वजनाशी संबंधित समस्या वाढवू शकते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सब्यूटी टिप्स