Lokmat Sakhi >Beauty > गुलाबी रंगाचा हा फेसपॅक लावा! चेहरा इतका तरुण की वय ऐकल्यावर लोक होतील चकित...

गुलाबी रंगाचा हा फेसपॅक लावा! चेहरा इतका तरुण की वय ऐकल्यावर लोक होतील चकित...

Anti-Aging Face Masks You Must Try At Home : Anti-Aging Face Masks Created with Simple Kitchen Ingredients : Anti-Ageing Face Masks for Smooth and Tight Skin : वय वाढल्याने चेहरा वयस्कर दिसू नये म्हणून वापरा हा खास गुलाबी अँटी-एजिंग फेसमास्क...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 12:27 PM2024-10-10T12:27:00+5:302024-10-10T12:39:53+5:30

Anti-Aging Face Masks You Must Try At Home : Anti-Aging Face Masks Created with Simple Kitchen Ingredients : Anti-Ageing Face Masks for Smooth and Tight Skin : वय वाढल्याने चेहरा वयस्कर दिसू नये म्हणून वापरा हा खास गुलाबी अँटी-एजिंग फेसमास्क...

Anti-Aging Face Masks You Must Try At Home Anti-Ageing Face Masks for Smooth and Tight Skin Anti-Aging Face Masks Created with Simple Kitchen Ingredients | गुलाबी रंगाचा हा फेसपॅक लावा! चेहरा इतका तरुण की वय ऐकल्यावर लोक होतील चकित...

गुलाबी रंगाचा हा फेसपॅक लावा! चेहरा इतका तरुण की वय ऐकल्यावर लोक होतील चकित...

वय वाढेल तशा चेहरा, हातापायांवर सुरकुत्या पडू लागतात. त्वचा सैल पडू लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या किंवा चेहऱ्याची त्वचा सैल पडू लागली की अनेकजणी अस्वस्थ होतात. अशावेळी वेगवेगळे उपाय करून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी काही घरगुती उपायही अत्यंत उपयुक्त ठरतात. स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थापासून सुरकुत्या कमी करणारे अँटी-एजिंग फेस मास्क (homemade face masks that are packed with anti-aging properties) तयार करता येतात. त्याचा चांगला उपयोगही होतो. याच्या नियमित वापराने त्वचा घट्ट होते, सुरकुत्या कमी होतात आणि तुम्ही तरुण दिसू लागता(Anti-Ageing Face Masks for Smooth and Tight Skin).

बीटरुट आणि तांदुळाच्या पिठात त्वचा डिप क्लिंज करण्याचे गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळून ती मऊ, चमकदार आणि तरुण दिसण्यास अधिक मदत मिळते. तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्किन केअर रुटीनमध्ये (Anti-Aging Face Masks Created with Simple Kitchen Ingredients) या फेसमास्कचा समावेश केला तर त्वचा अधिक घट्ट होते, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या खूपच कमी दिसतात. यामुळे त्वचेची लवचिकता वाढून ऐन चाळीशीतही त्वचा दीर्घकाळ तरुण दिसायला लागते. या फेसमास्कच्या रंगाप्रमाणेच आपली स्किन गुलाबी व तरुण दिसावी यासाठी हा फेसमास्क नक्की ट्राय करा. हा खास गुलाबी रंगाचा अँटी-एजिंग फेसमास्क कसा तयार करायचा ते पाहूयात(Anti-Aging Face Masks You Must Try At Home).

साहित्य :- 

१. बीटरुट रस - १ ते २ टेबसलस्पून 
२. तांदुळाचे पीठ - १ ते २ टेबसलस्पून 
३. दही - २ ते ३ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ?   

हा फेसमास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये बीटरुटचा रस १ ते २ टेबलस्पून घ्यावा. आता यात तांदुळाचे पीठ १ ते २ टेबलस्पून आणि दही २ टेबलस्पून घालावे. आता हे बाऊलमधील सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित ढवळून एकजीव करुन घ्यावे. आपला फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे. 

नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...


तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर अशी करेल जादू, दिवाळीत त्वचा चमकेल-नव्या दिसाल तुम्ही!

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला गुलाबी रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.   

करीनासारखी मऊ-मुलायम स्किन हवी? वापरा 'हा' नारंगी रंगाचा फेसमास्क, स्किन होईल मलईसारखी मुलायम...

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. बीटरुटचा रस :- निस्तेज, निर्जीव आणि कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी बीटाचा रस फायदेशीर ठरतो. बीटरूटमधील नैसर्गिक रंगद्रव्ये, ज्याला बेटॅलिन म्हटले जाते, याने त्वचा चमकदार होते. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास बीटरूट मदत करते. याच्या नियमित वापरामुळे त्वचा अधिक चमकदार होऊन त्वचेचा रंग उजळून येतो. 

२. तांदुळाचे पीठ :- पिगमेंटेशनसाठी तांदुळाचे पीठ खूपच चांगले मानले जाते. कारण यामुळे निस्तेज, कोरडी त्वचा दूर होण्यास मदत मिळते. यासोबतच तांदळाचे पीठ डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा जाऊन त्वचेला एक प्रकारचे टाईटनिंग येण्यास आणि त्वचा चमकदार दिसण्यास तांदुळाचे पीठ उपयोगी असते. 

३. दही :- दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सर्नबर्न व टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचेला ओलावा मिळतो, यामुळे त्वचा मऊ, मुलायम होते.

Web Title: Anti-Aging Face Masks You Must Try At Home Anti-Ageing Face Masks for Smooth and Tight Skin Anti-Aging Face Masks Created with Simple Kitchen Ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.