सेलिब्रिटींचं दिसणं हा नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी एक चर्चेचा विषय असतो. त्यातही वय वाढलं तरी सेलिब्रिटी (Celebrity) एवढे छान कसे काय दिसतात, असा प्रश्न तर हमखास आपल्या मनात डोकावून जातो. आजकाल तर अवघ्या तिसाव्या वर्षी डोळ्यांभोवती एखादी सुरकूती (anti aging effect) दिसू लागते आणि त्यानंतर मात्र आपण चांगलेच हादरून जातो. तिथून पुढे मग आपण आपलं ॲन्टी एजिंग रुटीन सुरू करण्याचा विचार करतो. प्रत्यक्षात रुटीन सुरू होईपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जातं आणि मग वयाच्या खाणाखूणा आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागतात.
हाच तर मुख्य फरक आहे आपल्यामध्ये आणि सेलिब्रिटींमध्ये. आता त्यांंचं कामच ते असल्यामुळे ते आपल्या दिसण्याबाबत अधिक जागरूक असणं अगदी साहजिक आहे. म्हणूनच तर त्यांच्या एवढं नाही जमलं तरी आपण पंचविशीपासूनच आपलं ॲण्टी एजिंग स्किन केअर रुटीन सुरू केलं पाहिजे, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. एका कार्यक्रमादरम्यान काजोलने (beauty secret of Kajol) नुकतंच तिचं ॲण्टी एजिंग रुटीन तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी आणि त्वचेवर वय वाढल्याच्या खाणाखुणा दिसू नये, म्हणून काजोलने जे सांगितलं आहे, ते अतिशय साधं सोपं आहे. कुणालाही ते अगदीच सहजपणे जमू शकतं. हे स्किन केअर रूटीन (skin care routine) शेअर करताना काजोल म्हणते की मी माझ्या स्किन केअर रूटीन बाबत अतिशय जागरूक असून मी ते स्ट्रिक्टली फॉलाे करते.
असं आहे काजोलचं ॲण्टी एजिंग रुटीन१. दररोज ८ ग्लास पाणी8 glasses of water dailyआरोग्यासाठी आणि त्वचेचं उत्तम पोषण व्हावं, यासाठी दररोज ८ ग्लास पाणी पिणं किती गरजेचं आहे, हे आपण बऱ्याचदा ऐकतो. पण फॉलो करणं होत नाही, म्हणून सोडून देतो. पण असं करू नका. कारण काजोल सांगतेय की तुमच्या चेहऱ्यावर वय वाढल्याची चिन्हे दिसू द्यायची नसतील तर दररोज ८ ग्लास पाणी प्यायलाच हवं. एवढं पाणी आपल्या पोटात जाईल, याकडे काजोलचं कटाक्षाने लक्ष असतं म्हणे.
२. ८ ते १० तासांची झोप8 to 10 hours sleepआजकाल अनेक जणांचं नाईट लाईफ खूप वाढलं आहे. त्यातही यात सगळ्यात जास्त संख्येने पंचविशीतल्या आत- बाहेरची तरूणाई दिसून येते. पण आरोग्यासोबतच त्वचा चांगली ठेवायची असेल तर ८ ते १० तासांची रात्रीची झोप दररोज घ्यायलाच हवी. योग्य झोप मिळाल्याने शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर तसेच चेहऱ्यावर दिसून येतो. काजोल म्हणते मी खूप लवकर झोपून जाते. त्यामुळे मी या बाबतीत त्या काही विचित्र लोकांमध्ये येते, ज्यांना अजिबातच नाईट लाईफ किंवा सोशल लाईफ नाही.
३. रात्रीचं ॲण्टी एजिंग रूटीनnight cream याबाबतीत सांगताना काजोल म्हणाली की रात्री झोपण्यापुर्वी मी माझा चेहरा आठवणीने धुते. या बाबतीत कोणतीही हयगय नाही. चेहरा व्यवस्थित आणि खूपच काळजीपुर्वक धुते. त्यानंतर तो स्वच्छ कोरडा करून त्यावर नाईट क्रिम अवश्य लावते आणि त्यानंतरच मी झोपते. असं केल्यामुळे रात्रभर आपल्या त्वचेला चांगलं पोषण मिळतं.
४. वर्कआऊट आणि डाएटworkout and dietकाजोल म्हणते वरच्या तिन्ही गोष्टींप्रमाणेच तुम्ही रोज किती आणि कसं वर्कआऊट करता आणि काय खाता याला खूप जास्त महत्त्व आहे. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केला तर तुमची त्वचा तरूण आणि टवटवीत राहते. तसेच योग्य डाएटमुळे तुमचं शरीर आणि मन निरोगी राहतं. याचाच परिणाम त्वचेवरही सकारात्मक पद्धतीने दिसून येतो.