आपण आजन्म तरुण दिसावं असं प्रत्येकीला वाटतं. आपलं वाढलेलं वय चेहऱ्यावर दिसू नये अशी आपली इच्छा असते. मात्र सुरकुत्या पडल्याने म्हणजेच शरीराचे त्वचेचे वय वाढल्याने आपण कधी ना कधी वयस्कर दिसायला लागतो. मग हे वाढलेलं वय झाकण्यासाठी आपण कधी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटस करतो तर कधी आपण महागडी ब्यूटी प्रॉडक्ट वापरुन या सुरकुत्या लपवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपलं वय काही केल्या लपत नाहीच. कधी ना कधी हे वय सगळ्यांना कळतंच. महिलांना तर वय जसं वाढत जातं तसे आपण वयस्कर व्हायला लागलो याचा काही वेळा ताणही येतो. मात्र वय वाढूनही चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील आणि दिर्घकाळ तरुण दिसायचं तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. झोपताना अगदी ५ मिनीटांत होतील असे हे उपाय नियमित केल्यास त्याचा चांगला फायदा होतो (Anti Aging Skin Care Tips).
१. गुलाब पाणी
गुलाब पाण्यात अँटी एजिंग गुण असतात, ज्यामुळे आपण तरुण दिसतो. त्यामुळे गुलाब पाण्याचे काही थेंब आपल्या बेंबीमध्ये घाला आणि त्याने चांगला मसाज करा. त्यामुळे आपण जास्त वर्ष तरुण दिसाल. गुलाबजलाला आयुर्वेदामध्ये आणि एकूण सौंदर्य उत्पादनांमध्येही अतिशय महत्त्व असल्याने त्याचा चांगला फायदा होतो.
२. तूप
तूप हा आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी उपयुक्त असणारा घटक आहे. वाढलेलं वय दिसू नये म्हणून आपण तुपाचा उपयोग करु शकतो. त्वचा मुलायम आणि आरोग्यदायी राहण्यासाठी तूप हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे. झोपायच्या आधी तूपाचे काही थेंब बेंबीमध्ये सोडावेत आणि पोटाला चांगला मसाज करावा.
३. बदामाचे तेल
बदामाचे तेल केसांसाठी चांगले असल्याने आपण त्याचा वापर करतो. त्याचप्रमाणे त्वेचचं आरोग्य चांगलं राहावं यासाठीही बदामाचं तेल अतिशय उपयुक्त असतं. बदामाच्या तेलात फॅटी अॅसिडस असतात जे निस्तेज आणि कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त असतात. त्यासाठी तुम्हाला बेंबीमध्ये ४ थेंब बदाम तेल घालून बोटांनी हलका मसाज करायला हवा.
४. कडुलिंब तेल आणि खोबरेल तेल
कडुलिंबाचं तेल अनेक अर्थांनी औषधी असते. आयुर्वेदात त्याला बरेच महत्त्व असून वाढलेले वय लपवण्यासाठी या तेलाचा चांगला उपयोग होतो. तसेच आपण केसांना लावतो ते खोबरेल तेलही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. कोमट केलेले खोबरेल तेल किंवा कडुलिंबाचे तेल बेंबीमध्ये घालून त्याने मसाज केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.