Join us  

Anti Aging Skin Care Tips : चेहरा वयस्कर वाटतोय? वाढत्या वयाच्या खुणा रोखण्याचे ५ उपाय; म्हातारे होईपर्यंत येणार नाहीत सुरकुत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 11:40 AM

Anti Aging Skin Care Tips : सुंदर दिसणे आणि त्वचा मेंटेन ठेवणे यात खूप फरक आहे. मेकअपच्या मदतीने आपण काही काळ सुंदर दिसू शकतो, परंतु नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते

अकाली वृद्धत्व ही नवीन समस्या नाही. आजकाल आपण अशा अनेक चुका करतो, ज्याचा फटका आपल्या सौंदर्याला सहन करावा लागतो. फेशियल, महागड्या क्रीम्स किंवा महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्सने त्या स्वतःला तरुण आणि सुंदर ठेवू शकतात, असं बहुतेक महिलांना वाटतं. या गोष्टींमुळे तुमची त्वचा निरोगी होऊ शकते, परंतु त्याचा प्रभाव जास्त काळ टिकत नाही.  (Skin doctor shares anti ageing tips for glowing skin) सुंदर दिसणे आणि त्वचा मेंटेन ठेवणे यात खूप फरक आहे. मेकअपच्या मदतीने आपण काही काळ सुंदर दिसू शकतो, परंतु नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (Anti Ageing Tips)

आजकाल कमी वयातच बारीक रेषा, सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली आहेत. हे टाळण्यासाठी अशा गोष्टींचा स्किन केअर रूटीनमध्ये  समावेश करा, ज्यामुळे ते रोखण्यात मदत होईल. अलीकडेच, तज्ञांनी याबद्दल काही टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्सचा वापर करून तुम्ही त्वचा दीर्घकाळ चांगली ठेवू शकता. 

सनस्क्रिन 

डॉक्टर किरण यांच्या म्हणण्यानुसार, वयानुसार चेहऱ्यावर वृद्धत्व दिसणे स्वाभाविक आहे, परंतु वेळेपूर्वी दिसणारी लक्षणे कमी होऊ शकतात. यासाठी नेहमी चेहऱ्यावर एसपीएफ सनस्क्रीन लावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बाहेर असाल किंवा आत, ते नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. खरं तर, अतिनील किरण इलॅस्टिन आणि कोलेजन तंतूंना नुकसान करतात, जे त्वचेला लवचिकता प्रदान करतात. कोलोजनच्या अभावामुळे सुरकुत्या, पिगमेंटेशन, सन टॅन अशा समस्या उद्भवू लागतात.

व्हिटामीन सी चा समावेश

अँटिऑक्सिडंट घटक त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. सुरकुत्यांव्यतिरिक्त, ते सूज कमी करण्यास देखील मदत करतात. प्रदूषणानं होणारं त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी, सकाळी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले उत्पादनं वापरा.

घामामुळे मेकअप लगेच खराब होतो? उन्हाळ्यात लग्नाला जाताना मेकअप टिकवण्यासाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स

त्वचेतील मॉईश्चर 

त्वचेला मॉइश्चरायझिंग ठेवा. हे खूप महत्त्वाचे आहे, जे ते टाळतात, त्यांना यातून होणारे नुकसान येत्या काही दिवसांत कळू शकेल. यामुळे केवळ वेळेआधीच वृद्धत्व येत नाही तर त्वचेच्या इतर समस्याही दिसू शकतात.

ह्यालूोरोनिक एसिडचा वापर

जसजसे आपले वय वाढते तसतसे त्वचेला अतिरिक्त बूस्टची आवश्यकता असते आणि यामुळे कोलेजन देखील वाढते. यासाठी ह्यालूोरोनिक ऍसिड वापरणे फायदेशीर ठरू शकते. हे त्वचा लवचिक ठेवते आणि सुरकुत्यांसारखी अकाली वृद्धत्वाची चिन्हं टाळते. त्वचेची लवचिकता वाढवण्यातही ते उपयुक्त ठरू शकते.

एक्स्ट्रा ग्लोसाठी काय कराल?

आजकाल चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी उपलब्ध आहेत ज्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. त्वचा तरुण आणि चमकदार बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे तुमच्या त्वचेला आराम देते, चेहऱ्याला नैसर्गिक चमक देते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी