Join us  

Anti Aging Tips : म्हातारे होईपर्यंत दिसणार नाहीत वयवाढीच्या खुणा; 5 ब्यूटी टिप्स वापरा, नेहमी दिसाल तरूण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:40 AM

Anti Aging Tips : कधीकधी आपण या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेच्या इतर समस्या दिसू लागतात.

आरोग्याची जशी विशेष काळजी घेतली जाते, तशीच त्वचेचीही काळजी घेतली पाहिजे. वेळेवर साफसफाई करणे, मॉइश्चरायझिंग करणे अशा अनेक गोष्टी आहेत. (Skin Care Tips) ज्याचे पालन आपण दररोज केले पाहिजे. दुसरीकडे, त्वचेची निगा राखण्याची दिनचर्या केवळ क्लींजिंग किंवा मॉइश्चरायझिंग करून पूर्ण होत नाही, तर त्यात इतर अनेक पायऱ्या देखील असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. (Dermatologist shares anti aging tips to prevent from wrinkles and fine lines)

कधीकधी आपण या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेच्या इतर समस्या दिसू लागतात. (Health Tips) चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा टाळण्यासाठी, एंटी एजिंग स्किन केअर टिप्स वापरायला हव्यात. त्वचारोगतज्ज्ञ अनिका गोयल यांनी इन्स्टाग्रामवर एंटी एजिंग टिप्स शेअर केल्या आहेत. चेहरा नेहमी आकर्षक आणि फुललेला दिसावा असं तुम्हालाही वाटत असेल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. (Anti ageing Tips)

या वयापासून एंटी एजिंग स्किन केअर करा

तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 20 व्या वर्षापासून अँटी-एजिंग ब्युटी रूटीन सुरू केले पाहिजे.  लोक म्हणतात की वयाच्या 40 व्या वर्षी ते पाळले पाहिजे, परंतु तसे नाही. अँटी-एजिंग म्हणजे वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करणे. हे स्पष्ट आहे की जितक्या लवकर तुम्ही ते सुरू कराल तितके तुम्ही त्वचेला बारीक रेषा, सुरकुत्या किंवा वृद्धत्वाच्या इतर समस्यांपासून वाचवू शकता.

आहारात या पदार्थांचा समावेश करा

संतुलित आहार केवळ आरोग्यासाठीच नाही तर निरोगी राहण्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. आपल्या आहारात अधिकाधिक जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. यासाठी फळे, भाज्या, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स यांसारख्या गोष्टींचा समावेश करणे योग्य ठरेल. जर तुम्ही निरोगी असाल तर त्वचा स्वतःच चमकू लागते.

५ चुकांमुळे बाथरूममध्ये अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक; सर्वाधिक लोक करतात दुसरी चूक

सनस्क्रीन लावणं गरजेचं

१) अकाली वृद्धत्व, ऑक्सिडेटिव्ह तणाव यांसारख्या गोष्टी टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये रेटिनॉलचा देखील समावेश करा. आजकाल अशी अनेक सौंदर्य उत्पादने आहेत ज्यात रेटिनॉल असते.

२) पेशींवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्सचा वापर केला पाहिजे. यासाठी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये अँटिऑक्सिडंट समृद्ध सौंदर्य उत्पादनांचा समावेश करा. आजकाल अनेक सीरम आणि क्रीम्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.

डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम

३) तज्ज्ञांच्या मते तणाव हा त्वचा आणि केसांचा सर्वात मोठा शत्रू आहे. ते घेतल्याने अनेक समस्या सुरू होतात. एवढेच नाही तर चेहरा लवकर म्हातारा दिसतो. त्यामुळे यापासून जमेल तितके दूर राहा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी