वाढत्या वयाला तुम्ही थांवबू शकतं नाही पण वाढत्या वयाच्या त्वचेवरच्या खुणांना नक्की थांबवू शकता. तुम्हालाही तुमच्या वाढत्या वयाबद्दल किंवा लूक बदलण्याची काळजी वाटत असेल तर तुमच्या जीवनशैलीत बदल करायला हवा. तुमचा विश्वास बसणार नाही पण रोजच्या जगण्यातील काही चुकांमुळे तुम्ही लवकर वयस्कर दिसू शकता.
कारणं
जास्त प्रमाणात साखर खाणं
टफ्ट्स यूनिवर्सिटीतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त साखरेच्या आहारामुळे शरीरात जास्त प्रमाणत टॉक्सिन्स तयार होतात. या टॉक्सिन्समुळे विषारी पदार्थांना बाहेर टाकणारी शरीराची क्षमता कमी होते. अशा प्रकारे जास्त साखर असलेल्या आहाराचे सेवन केल्यास दोन्ही बाजूंनी शरीरावर परिणाम होतो. कमी वयातच सुरकुत्या, वय वाढीच्या खुणा दिसण्यासाठी अनियमित आहार, झोपेचा अभाव तसंच जास्त प्रमाणात साखर खाणं हे घटक कारणीभूत ठरू शकतात.
जास्तवेळ फोनचा वापर
गॅझेट्समधून निळ्या प्रकाशाचे जास्त प्रमाण हे अकाली वृद्धत्व वाढवू शकते. आता प्रत्येकजण घरून काम करीत आहे. ऑनलाईन मिटिंग्स, सेशन यामुळे स्किनशी सतत संपर्क येत असतो. यामुळे तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला स्वतःला आराम द्यायचा असेल आणि भविष्यात तोंडावरील वय वाढीच्या खुणा टाळायच्या असतील तर ठराविक वेळेतच मोबाईल फोनचा वापर करा.
नाष्ता न करणं
सकाळी कामासाठी बाहेर पडण्याची घाई असल्यामुळे अनेक महिला घरातील काम आवरून काहीही न खाताच घराबाहेर पडतात. या सवयीमुळे आरोग्याचं मोठं नुकसान होत असतं. सकाळचा नाष्ता न केल्यामुळे शरीराला उर्जा मिळत नाही. त्यामुळे अनेक तास उपाशी राहील्यामुळे थकवा येत असतो. परिणामी त्वचेचं सौंदर्य कमी होतं.
स्मोकिंग
काही लोकांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर आधी सिगारेट लागतेच. पण असं केल्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम पडत असतो. इतकंच नाही तर त्वचेवर सुद्धा वाईट परिणाम होतो. कमी वयात सुद्धा वृद्ध असल्यासारखी त्वचा दिसते. त्यामुळे लगेच नाही पण शक्य होईल तितक्या लवकर सिगारेट ओढणं बंद करा. नाहितर कमी वयातचं तुम्ही म्हातारे दिसाल.
पाणी कमी पिणं
सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेवर पिंपल्स, सुरकुत्या येण्याची शक्यता असते. त्यासाठी उठल्यानंतर सगळ्यात आधी त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी पोटभर पाणि प्या. दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाण्याचे सेवन करा.
लक्षणं
त्वचेतील बदल
५० वर्षानंतर चेहरा, त्वचा आणि हातांवर पांढरे डाग दिसायला सुरूवात होते. असे स्पॉट्स जास्त दिसत असतील तर दुर्लक्ष न करता लवकरता लवकर तज्ज्ञांशी संपर्क करायला हवा. मान, कपाळ, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या दिसू लागतात.
स्मरणशक्ती कमकुवत होणं
वाढत्या वयात स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. ६५ वयानंतर अनेकांना डिमेंशन, अल्जायमरची समस्या उद्भवते. संतुलित आहार, व्यायाम दररोज करून तुम्ही अशी स्थिती टाळू शकता.
डोळ्यांवर परिणाम
जसजसं वय वाढत जातं तसं नजरेवर परिणाम होतो. त्यामुळे ग्लूकोमा, नाईट ब्लाइंडनेस त्रास वाढू शकतो. या समस्येपासून बचाव करण्यासाठी स्मोकिंग करणं सोडा, चांगला आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा