Join us  

अँटी एजिंग वॉटर, ऐकलंय असं तरुण ठेवणारं जादुई पाणी? घरातले 2 मसाले, आणि बघा पाण्याची जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 2:16 PM

दालचिनी, चक्रफूल हे दोन तीव्र स्वादाचे मसाले त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. या दोन मसाल्यांच्या सहाय्याने अनेक सौंदर्यविषयक समस्या स हज सुटतात आणि तरुण दिसण्याची इच्छाही हे दोन मसाले पूर्ण करतात. त्यासाठी काय करायचं?

ठळक मुद्दे दालचिनी, चक्रफुलं वापरुन अँण्टि एजिंग वॉटर तयार करता येतं.अँटी एजिंग वॉटरनं चेहेर्‍यावरच्या अनेक समस्या सहज निघून जातात. चेहेरा तरुण ठेवण्याचा इफेक्टिव्ह उपाय म्हणजे अँटी एजिंग वॉटर.

स्वयंपाकघरातले मसाले हे केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नसतात. या मसाल्यांचा उपयोग अनेक आजारांवर प्रभावी घरगुती उपाय म्हणून करतात. हेच मसाले आपल्याला वय वाढत असलं तरी तरुण दिसण्यासाठी, चेहेर्‍याचं सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतात हे माहीत आहे का?

Image: Google

अँटी एजिंग वॉटर

दालचिनी, चक्रफूल हे दोन तीव्र स्वादाचे मसाले त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. या दोन मसाल्यांच्या सहाय्याने अनेक सौंदर्यविषयक समस्या सहज सुटतात आणि तरुण दिसण्याची इच्छाही हे दोन मसाले पूर्ण करतात. या मसाल्यांच्या सहाय्यानं चेहेर्‍यावरचे मुरुम पुटकुळ्या, मृत पेशी , मृत त्वचा आणि सुरकुत्या निघून जातात. या दोन मसाल्यांचे हे प्रभावी उपाय बघून कोणालाही हे मसाले सौंदर्यासाठी वापरुन पाहावेसे वाटतील. पण ते वापरायचे कसे? दालचिनी , चक्रफूल आणि पाणी यांचा वापर करुन अँटी एजिंग वॉटर तयार केलं जातं. हे पाणी तयार करणं आणि ते चेहेर्‍यासाठी वापरणं दोन्हीही खूप सोपं आहे. अँटी एजिंग वॉटर तयार करण्यासाठी 3 चक्रफुलं, 1 इंच दालचिनी आणि अर्धा लिटर पाणी घ्यावं. तिन्ही गोष्टी एका भांड्यात घ्याव्यात. हे भांड गॅसवर ठेवून पाणी मंद आचेवर उकळू द्यावं. पाणी उकळताना पाण्याचा रंग बदलायला लागतो. तो बदलला की भांडं गॅसवरुन उतरवून घ्यावं. हे पाणी थंड होवू द्यावं. पाणी थंड झालं की ते एका बाटलीत भरुन फ्रिजमधे ठेवावं. हे पाणी फ्रिजमधे टिकून राहतं.

अँटी एजिंग वॉटर कसं वापरावं?

अँटी एजिंग वॉटर चेहेर्‍याला लावण्यापूर्वी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. तो रुमालानं टिपून घ्यावा. कापसाचा बोळा घ्यावा. त्यावर अँटी एजिंग वॉटर टाकून तो बोळा चेहेरा आणि मानेवर फिरवावा. हे पाणी लगेच सुकतं. सकाळी उठल्यानंतर चेहेरा पाण्यानं धुवावा.