Lokmat Sakhi >Beauty > Antiaging Skin Care Tips : वयाची तिशी उलटल्यावरही दिसाल सुंदर - तरुण आणि फ्रेश, नियमीत करा फक्त ५ गोष्टी

Antiaging Skin Care Tips : वयाची तिशी उलटल्यावरही दिसाल सुंदर - तरुण आणि फ्रेश, नियमीत करा फक्त ५ गोष्टी

Antiaging Skin Care Tips : नियमितपणे काही सोप्या गोष्टी फॉलो केल्या तर आपणही चिरतरुण दिसू शकतो, त्यासाठी काय करायचे पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 11:25 AM2022-05-20T11:25:52+5:302022-05-20T11:28:18+5:30

Antiaging Skin Care Tips : नियमितपणे काही सोप्या गोष्टी फॉलो केल्या तर आपणही चिरतरुण दिसू शकतो, त्यासाठी काय करायचे पाहूया...

Antiaging Skin Care Tips: Look beautiful even after turning 30 - young and fresh, just 5 things to do regularly | Antiaging Skin Care Tips : वयाची तिशी उलटल्यावरही दिसाल सुंदर - तरुण आणि फ्रेश, नियमीत करा फक्त ५ गोष्टी

Antiaging Skin Care Tips : वयाची तिशी उलटल्यावरही दिसाल सुंदर - तरुण आणि फ्रेश, नियमीत करा फक्त ५ गोष्टी

Highlightsघरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने फेसमास्क तयार करता येतात. आपल्या चेहऱ्याचा पोत लक्षात घेऊन हे मास्क तयार करायला हवेत. शरीराला सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रथिने आणि फायबर्स मिळत असतील तर त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

आपण कायम चिरतरुण दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र ठराविक वयानंतर आपले वय चेहऱ्यावर दिसायलाच लागते. हे वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून कधी आपण पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेतो तर कधी काही घरगुती उपाय करतो. पण याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. बॉलिवूड अभिनेत्री मात्र वयाच्या पन्नाशीतही अगदी तरुण असल्यासारख्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो वय झालं तरी कमी होत नाही (Antiaging Skin Care Tips). काही ब्यूटी टिप्स वापरल्या तर आपणही कदाचित वय वाढले तरी त्यांच्याइतके तरुण दिसू शकतो. प्रसिद्ध ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांनी वयाच्या तिशीनंतर वाढलेले वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स कोणत्या ते पाहूया... 

(Image : Google)
(Image : Google)

१. स्कीन केअर रुटीन 

आपली त्वचा कायम ग्लोईंग आणि फ्रेश राहावी यासाठी आफण स्कीन केअर रुटीन फॉलो करायला हवे. वयाच्या ३० किंवा ३५ वर्षानंतर आपल्या चेहऱ्यावर वय वाढल्याच्या खुणा दिसायला लागतात आणि आपले वय वाढत असल्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. यामध्ये डोळ्याखाली सुरकुत्या येणे, चेहऱ्यावर सुरकुत्या वाढणे अशी लक्षणे दिसतात. मात्र आपण ठराविक स्कीन केअर रुटीन फॉलो केले तर मात्र या सुरकुत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते. चेहऱ्यासाठी कमीत कमी साबण किंवा फेसवॉश वापरणे. मॉईश्चरायजरचा आवर्जून वापर करणे, रात्रीच्या वेळी चेहऱ्याला मोकळा श्वास घेता यावा म्हणून काहीही न लावता झोपणे. आठवड्यातून एकदा चेहऱ्याला घरगुती पदार्थांपासून केलेला फेसमास्क लावणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात.

२. क्लिंजिंग, मॉईश्चरायजिंग, मास्क

आपल्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार त्वचेसाठी वेगवेगळी उत्पादने वापरायला हवीत. त्वचा कोरडी असेल तर आपण वापरत असलेल्या उत्पादनांमध्ये मॉईश्चर जास्त असणे गरजेचे असते. तर त्वचा खूप ऑयली असेल तर आपण वापरत असलेली उत्पादने त्या पद्धतीने असायला हवीत. साधारण वयाच्या ३० किंवा ३५ शी नंतर आपण मेकअपचा जास्त प्रमाणात वापर करतो. पण हा मेकअप चेहऱ्यावर दिर्घकाळ तसाच राहिला तर त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेकअपनंतर आवर्जून क्लिंजिंग करायला हवे. तसेच सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आवर्जून मॉईश्चरायजर लावायला हवे. म्हणजे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.

३. सनस्क्रीन वापरा

सध्या उन्हाचा तडाखा जास्त आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना न विसरता सनस्क्रीन लोशन लावा. यामुळे त्वचेचे चांगल्या पद्धतीने संरक्षण होऊ शकते. नाहीतर सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा खराब होऊ शकते. उन्हामुळे चेहऱ्यावर आणि हातावर काळे डाग येणे, रॅश येणे, खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. मात्र सनस्क्रीन लोशन लावल्यास या समस्या दूर राहण्यास मदत होते.

(Image : Google)
(Image : Google)

४. डाएटची काळजी घ्यायला हवी

आपले सौंदर्य हे आपल्या आहारावरही अवलंबून असते. भरपूर पाणी प्यायल्यास त्वचा डिटॉक्स हो्ण्यास मदत होते. तर जास्त मसालेदार, तेलकट आहार घेतला तर त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या उद्भवते. त्वचा तजेलदार हवी असेल तर ताजी फळे, सलाड, पालेभाज्या यांचा आहारात समावेश असायला हवा. इतकेच नाही तर शरीराला सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रथिने आणि फायबर्स मिळत असतील तर त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्यादृष्टीने आपल्या आहाराचे नियोजन हवे. 

५. फेसमास्क 

घरच्या घरी कोरफ़डीचा गर, दही, मध, हळद, बेसन, तांदळाचे पीठ, लिंबू, बटाटा यांसारख्या गोष्टींचा वापर करुन आपल्याला विविध पद्धतीचे फेसमास्क तयार करता येतात. विकतचे महागडे फेसमास्क किंवा फेशियल आणि फेस क्रीम वापरण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने फेसमास्क तयार करता येतात. आपल्या चेहऱ्याचा पोत लक्षात घेऊन हे मास्क तयार करायला हवेत. 

Web Title: Antiaging Skin Care Tips: Look beautiful even after turning 30 - young and fresh, just 5 things to do regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.