Join us  

Antiaging Skincare Tips : आहात त्यापेक्षा 10 वर्षांनी तरुण दिसायचे असेल तर पाहा जपानी सिक्रेट- चेहऱ्यावर ग्लो असा की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 10:40 AM

Antiaging Skincare Tips : जपानी महिलांचं वय त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही, याचं कारण काय असावं, पाहूयात

ठळक मुद्देतांदळापासून राईस क्रिम तयार करुन जपानी महिला नियमित आपल्या चेहऱ्याला लावतात.                   वाढतं वय लपवण्यासाठी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस घेण्यापेक्षा करा १ घरगुती उपाय

आपण आहोत त्यापेक्षा कमी वयाचं दिसावं असं प्रत्येक महिलेला वयाच्या बहुतांश टप्प्यावर वाटत असतं. पण वय जसं वाढत जातं तसं नैसर्गिकरित्या शरीरात बदल होत असल्याने ते नकळत आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. वयानुसार आपली त्वचा, हाडं, शरीर सगळंच थकतं आणि ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. त्वचा सैल पडणे, डोळ्याखाली सुरकुत्या येणे, केस पांढरे होणे ही त्याचीच काही लक्षणे असतात. मात्र असे व्हायला लागले की आपण अस्वस्थ होतो आणि तरुण दिसण्यासाठी नेमके काय उपाय करावेत ते आपल्याला कळत नाही. (Antiaging Skincare Tips) पण आपल्या चेहऱ्याची त्वचा कायम यंग आणि डायनॅमिक दिसावी यासाठी आज आपण काही खास उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आहात त्याहून १० वर्षांनी लहान दिसू शकता. जपानी महिलांचं वय त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही, याचं कारण काय असावं, त्या नेमकं काय करतात (Japani Secret) ज्यामुळे त्यांचं वाढलेलं वय लपलं जातं, पाहूयात...

(Image : Google)
           

जपानी महिलांचं तारुण्य सिक्रेट 

खाण्यासाठी आपण प्रामुख्याने तांदळाचा उपयोग करतो. भात हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भात आपण अगदी आवर्जून करतो आणि तितक्याच आवडीने खातोही. पण हाच तांदूळ आपल्या त्वचेसाठीही तितकाच उपयुक्त असतो असं कोणी म्हटलं तर कदाचित आपल्याला ते पटणार नाही. पण तांदळापासून राईस क्रिम तयार करुन जपानी महिला नियमित आपल्या चेहऱ्याला लावतात.                   

राईस क्रिम कसं तयार करायचं ? 

१. एका भांड्यात २ चमचे तांदूळ आणि १ कप पाणी घालायचे. २. मंद आचेवर तांदूळ चांगले शिजू द्यायचे. ३. भात चांगला शिजला आणि घट्टसर पेज दिसायला लागला की गॅस बंद करुन टाकायचा.४. गार झाल्यावर मिक्सरमधून या भाताची पेस्ट करुन घ्यायची.५. त्यामध्ये १ चमचा गुलाबपाणी घालायचे. ६. ही पेस्ट गाळून घ्यायची आणि त्यामध्ये दोन चमचे दूध घालावे. ७. यामध्ये १ चमचा ऑलिव्ह ऑईल आणि १ चमचा खोबरेल तेल घालून हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.८. हे राईस क्रिम केल्या केल्या लावले तर चांगलेच पण नंतरही आपण ते वापरु शकतो, त्यामुळे एका हवाबंद बाटलीत भरुन ठेवा.

(Image : Google)

राईस क्रिम चेहऱ्याला कसं लावायचं? 

१. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला राईस क्रिम लावा.२. त्याआधी चेहरा क्लिंजर किंवा गुलाब पाण्याने स्वच्छ धुवा. ३. चेहरा जास्त कोरडा असेल तर बदाम तेल किंवा खोबरेल तेलाने मसाज करा आणि मगच राईस क्रिम लावा. त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल. ४. रात्रभर राईस क्रिम चेहऱ्यावर तसेच राहू द्या. सकाळी उठल्यावर चेहरा गार पाण्याने धुवून टाका.

राईस क्रिमचे फायदे 

१. त्वचा उजळण्यासाठी आणि त्वचेवर तेज आणण्यासाठी हे क्रिम अतिशय परिणामकारक असतं.२. चेहऱ्यावर वयोमानामुळे ज्या सुरकुत्या येतात त्या येऊ नयेत यासाठी या क्रिमचा अतिशय चांगला उपयोग होतो.३. चेहऱ्यावरचे डाग, फोड कमी होण्यासाठीही या क्रिमचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी