Join us

आंघोळीपूर्वी चेहऱ्याला लावा ५ पदार्थ, चेहऱ्यावर येईल इतकं तेज की पार्लर आणि फेशियलची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 16:18 IST

Apply this things before shower: skin care tips: Beauty care tips: glowing skin care: skin care routine: skin care tips for glowing skin: home remedies for skin: What to apply before a shower on skin: What to put on skin before a shower: Avoid parlor things to apply skin: त्वचा अधिक तजेलदार दिसण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊया.

आपल्या शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव म्हणजे त्वचा. आपण कोणतेही चुकीचे पदार्थ खाल्ले किंवा चुकीच्या प्रॉडेक्टचा चेहऱ्यावर वापर केला ही त्याचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. (skin care tips)त्वचा अधिक सुंदर आणि ग्लो करण्यासाठी आपण वारंवार त्वचेवर काहींना काही लावत असतो. ज्यामुळे तो चमकदार तर बनतो पण काही काळासाठीच. (skin care tips for glowing skin)

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्या पुरेशा प्रमाणात वेळ मिळत नाही. ज्यामुळे चेहरा चमकदार बनण्याऐवजी तो अधिक कोरडा पडू लागतो. त्वचेवर मुरुम, पुरळ आणि ब्लॅकहेड्सचा त्रास वाढतो.(home remedies for skin)जर तुम्हालाही त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर आंघोळीला जाण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे स्वयंपाकघरातील ५ पदार्थ चेहऱ्याला लावल्यास त्वचा उजळेल. त्वचा अधिक तजेलदार दिसण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊया.(What to apply before a shower on skin)

चेहर्‍याला सारखं गुलाबपाणी लावता? चेहरा होईल खराब, या ५ गोष्टी लक्षात ठेवाच..

1. बेसन आणि दूध 

आंघोळ करण्यापूर्वी बेसन आणि दूधाचा फेसपॅक तयार करा. १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. आंघोळ करताना हलक्या हाताने चेहरा घासून धुवा. चेहरा उजळण्यास मदत होईल तसेच त्वचेवरील डाग देखील कमी होतील. बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. 

2. ओट्स आणि दही 

ओट्स आणि दह्याची पेस्ट तयार करुन चेहरा, मान, घसा, हात आणि पायांवर लावू शकता. या पेस्टने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्वचेचा खडबडीतपणा कमी होतो. त्वचा मऊ होते. ओट्स आणि दही पॅक कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास प्रभावी ठरतात. 

3. टोमॅटो प्युरी 

टोमॅटो प्युरीमध्ये अँटी-ऑक्सि़डंट्स आणि जीवनसत्त्व असतात ज्याचा त्वचेला फायदा होतो. टोमॅटो तेलकट त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. त्वचा चमकदार बनते. ही प्युरी साधरण त्वचेवर १० मिनिटे ठेवायला हवी. 

4. गुलाब पाणी 

अनेकदा आंघोळ झाल्यानंतर त्वचेची काळजी घेतली जात नाही. त्यासाठी आंघोळीपूर्वीच गुलाब जल चेहऱ्यावर लावायला हवं. हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. आंघोळीच्या १० ते १५ मिनिटे आधी चेहर्‍यावर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट होऊन उजळते. 

5. कच्चे दूध 

महागड्या पार्लरमध्ये जाण्यापेक्षा कच्चे दूध त्वचेसाठी चांगले आहे. कच्च्या दुधात एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहे जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. कच्च्या दुधात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी