Join us  

हिवाळ्यात लावा बबल फेस मास्क, बनवा घरच्याघरी झटपट, त्वचा दिसेल चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 3:39 PM

Bubble Face Mask Winter Home Remedy एजिंगच्या लक्षणांपासून वाचवेल हा मास्क, बनवण्यास सोपे, निस्तेच त्वचा होईल गायब

हिवाळ्यात बऱ्याच जणांची त्वचा ही निस्तेज आणि रुक्ष होते. काहींची त्वचा ही रुक्ष होण्यामागचे कारण त्यांची बिघडलेली जीवनशैली असते. त्वचाची योग्यरीत्या काळजी न घेतल्यामुळे देखील त्वचेच्या बाबतीत आजार उद्भवतात. दुसरीकडे, त्वचेची काळजी घेत असताना, लोक त्वरित परिणामांची अपेक्षा करतात. मात्र, प्रत्येक गोष्टीला वेळ हा द्यावाच लागतो. जर तुम्हाला त्वरित रिझल्ट हवा असेल तर तुम्ही बबल फेस मास्कचा वापर करू शकता. ऑक्सिजनने भरलेले हे मास्क त्वचेला चांगले पोषण देण्याचे काम करतील. आपण घरच्या घरी बबल फेस मास्क तयार करून त्वचेला ग्लोइंग आणि आकर्षक बनवू शकता. या मास्कमुळे तुमची निस्तेज त्वचा जाईल आणि एक चमकदार त्वचा दिसून येईल.

बबल मास्क बनवण्यासाठी लागणारं साहित्य

5 चमचे काओलिन चिकणमाती

3 टीस्पून बेकिंग सोडा

1 चमचे सायट्रिक ऍसिड

2 चमचे इसेंशियल ऑईल (टी ट्री/ लैवेंडर)

बबल फेस मास्क बनवण्याची योग्य पद्धत

काओलिन चिकणमाती, बेकिंग सोडा आणि सायट्रिक ऍसिड एका भांड्यात घ्या आणि या मिश्रणाला एकत्रित करून चांगले मिसळा. आता त्यात हाइड्रोसोल आणि 2 चमचे इसेंशियल ऑईल मिसळा. आणि नीट ढवळून घ्या. काही वेळात तुमचा फेस मास्क तयार होईल. आता ही पेस्ट त्वचेवर लावा आणि १५ ते २० मिनिटे त्वचेवर राहू द्या. या दरम्यान, त्वचेवर फुगे दिसू लागतील. जेव्हा ही पेस्ट कोरडी होईल तेव्हा थंड पाण्याने धुवून टाका. आपण इच्छित असल्यास, एका घट्ट कंटेनरमध्ये उर्वरित साहित्य देखील साठवू शकता. आणि आठवड्याभरानंतर पुन्हा लावू शकता.

बबल फेस मास्कचे फायदे

या मास्कचा फायदा असा आहे की, यामुळे त्वचा चमकदार दिसते, यासह आपल्या त्वचेला एजिंगच्या लक्षणांपासून वाचवते. महिन्यातून किमान दोनदा चेहऱ्यावर बबल मास्क लावा. असे केल्याने, त्वचेतील रक्तप्रवाह चांगले होईल. जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर तुम्ही बबल फेस मास्कच्या मदतीने ते काढू किंवा कमी करू शकता. तुम्हाला फक्त बबल फेस मास्क महिन्यातून दोनवेळा लावावे लागेल. जेणेकरून तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी