आपल्या स्किनची काळजी घेण्याबाबत प्रत्येक स्त्री ही जागरूक असते. स्किन सुंदर ठेवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या असंख्य ब्युटी प्रॉडक्सचा वापर आपण करतो. या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये कोणत्या प्रकारच्या इंग्रिडियंटसचा वापर केला जातो याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. एवढेच नव्हे तर हे ब्युटी प्रॉडक्ट्स फार महाग असतात. आपले ब्युटी प्रॉडक्ट्स जर आपणच घरी बनवले तर ते स्किनसाठी सेफ आणि कमी खर्चात बनवले जाऊ शकतात. कोरड्या त्वचेसाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. आता बॉडी बटर हा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. कोरड्या आणि खरखरीत झालेल्या स्किनला पुन्हा मऊ व निरोगी करण्यात मदत करते. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले बॉडी बटर स्किनमध्ये आर्द्रता लॉक करून स्किन पुन्हा पूर्ववत मऊ बनवते. स्किनची काळजी घेण्यात नैसर्गिक घटकांपासून बनवलेले बॉडी बटर तुमची मदत करू शकते.(Homemade Body Butter Recipe).
बॉडी बटर म्हणजे नेमकं काय ?
बॉडी बटर हा मॉइश्चरायझरचाच एक प्रकार आहे जो आपल्या त्वचेला खोलवर हायड्रेट करतो. बॉडी बटर हे साधारणपणे कोकोआ बटर, शिया बटर आणि इसेन्शिअल ऑईलपासून बनवलेले एक घट्टसर क्रिम असते.
साहित्य -
१. नारळाचे तेल - १ / ३ कप
२. शिया बटर - १ / ३ कप
३. कोकोआ बटर - १ / ३ कप
४. जोजोबा तेल किंवा स्वीट आलमंड ऑईल - १ / ३ कप
५. अरारोट पावडर - २ चमचे
६. इसेन्शिअल ऑईल - १५ ते २० थेंब
कृती -
१. एका काचेच्या बाऊलमध्ये, सर्व साहित्य एकत्रित करून घ्या.
२. डबल बॉयलरचा वापर करून हे सर्व मिश्रण मध्यम आचेवर ठेवा. जोपर्यंत सगळे जिन्नस विरघळून एकत्रित होत नाहीत तोपर्यंत हे मिश्रण लाकडी चमच्याने ढवळत राहा.
३. त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्या.
४. थंड झाल्यावर हे मिश्रण १ तास रेफ्रिजरेट करून घ्या.
५. तासाभरानंतर हे मिश्रण बाहेर काढून हॅन्ड मिक्सरच्या साहाय्याने फेटून घ्या. जोपर्यंत या मिश्रणाचा रंग पांढरा होत नाही तोपर्यंत फेटून घ्या.
६. सगळ्यात शेवटी इसेन्शिअल ऑईलचे काही थेंब घालून परत एकदा फेटून घ्या.
७. एका हवाबंद काचेच्या बाटलीत हे बॉडी बटर भरून स्टोअर करून ठेवा.
अश्याप्रकारे घरच्या घरी केमिकल फ्री बॉडी बटर बनवून तुमच्या स्किनची काळजी घ्या.